Shubman Gill च्या रन आऊटनंतर सोशल मीडियावर चाहत्यांचा तांडव; पाहा प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 shubman gill

Shubman Gill च्या रन आऊटनंतर सोशल मीडियावर चाहत्यांचा तांडव; पाहा प्रतिक्रिया

IND vs WI 2022 : भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 3 धावांनी पराभव केला. त्रिनिदाद येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना कॅरेबियन संघासमोर 309 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ निर्धारित 50 षटकांत 6 गडी गमावून 305 धावाच करू शकला. भारतीय कर्णधार शिखर धवनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. कॅरेबियनसाठी रोमॅरियो शेफर्ड आणि अकील होसेन यांनी 7व्या विकेटसाठी 53 धावा जोडून संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय संघाने हा सामना जिंकला.

हेही वाचा: WI vs IND Live 1st ODI: भारताचा अवघ्या 3 धावांनी विजय

शुभमन गिलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार खेळी केली. शुभमनने 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, शुबमन गिल अर्धशतक पूर्ण करून धावबाद झाला. शुभमन गिल ज्याप्रकारे धावबाद झाला त्यावर चाहते सतत प्रतिक्रिया देत आहेत. भारताचा सलामीवीर शुभमन गिल ज्या पद्धतीने धावबाद झाला, त्यावर चाहते आपली मते मांडत आहेत. भारताच्या 18 व्या षटकात शुभमन गिल धावबाद झाला. त्यावेळेस वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ गोलंदाजी करत होता.

हेही वाचा: Pro Kabaddi लीगच्या नवव्या मोसमाचा दम लवकरच घुमणार

अल्झारी जोसेफ वेस्ट इंडिजसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकांत 61 धावांत दोन विकेट घेतल्या. मोटेने याशिवाय 10 षटकांत 54 धावा देत 2 बळी घेतले. अकील होसेन विकेट घेण्यात अपयशी ठरला. अकिल हुसेनने 10 षटकात 51 धावा दिल्या, पण त्याला एकही विकेट घेण्यात अपयश आले. वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने 2 षटके टाकली आणि 23 धावा दिल्या.

Web Title: Shubman Gill Run Out In First Odi Against West Indies Social Media Users Reacted Ind Vs Wi Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..