
राजगीर : पुण्याच्या सिद्धेश घोरपडे याने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये पदकांची हॅट्ट्रिक साजरी केली. त्याने सलग तिसऱ्या दिवशी पदक जिंकण्याची किमया करून दाखवली, हे विशेष. ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत गुरुवारी अखेरच्या दिवशी मराठमोळ्या सिद्धेशने केरिन रेसमध्ये बाजी मारत सुवर्णपदकावर मोहर उमटवली. महाराष्ट्राने या क्रीडा महोत्सवातील पदक तक्त्यात अव्वल स्थान कायम राखत पदकांचा सुवर्णमहोत्सव साजरा केला. पदकांचे अर्धशतक झळकावण्याची हॅट्ट्रिक करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे.