सिंधू ‘बीडब्ल्यूएफ’ ॲथलीट आयोगाची निवडणूक लढवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पी व्ही सिंधू

सिंधू ‘बीडब्ल्यूएफ’ ॲथलीट आयोगाची निवडणूक लढवणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : दोन वेळा ऑलिंपिक पदक जिंकणारी भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू ही जागतिक बॅडमिंटन फेडरेशन (बीडब्ल्यूएफ) अॅथलीट आयोगाची निवडणूक लढवणार आहे. स्पेनमध्ये १७ डिसेंबरपासून जागतिक बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होणार असून याच कालावधीत ही निवडणूक पार पडणार आहे. सिंधूची २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती.

हेही वाचा: Solapur : अडीच एकरात तब्बल २४१ टन ऊस

आता २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी ती पुन्हा उभी राहणार आहे. आयोगाच्या सहा जागांसाठी नऊ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. सिंधूसह टोकियो ऑलिंपिकमधील महिला दुहेरीत सुवर्णपदक जिंकणारी इंडोनेशियाची खेळाडू ग्रेसीया पोल्लीदेखील ही निवडणूक लढवणार आहे.

loading image
go to top