अडीच एकरात तब्बल २४१ टन ऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur : अडीच एकरात तब्बल २४१ टन ऊस

Solapur : अडीच एकरात तब्बल २४१ टन ऊस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उपळाई बुद्रूक : सातत्याने दुष्काळ, गेली दोन वर्षापासून कोरोना महामारीचे संकट, त्यात अतिवृष्टी अशा एक ना अनेक संकटांनी शेतकरी वारंवार संकटात सापडला आहे. त्यामुळे शेती करणे म्हणजे एक आव्हानच निर्माण झाले आहे. पण शेतकऱ्याकडे मेहनत करायची जिद्द असेल अर्न नाविन्यपूर्ण कल्पनाद्वारे शेती केल्यास विक्रमी उत्पादन घेता येते, हे उपळाई बुद्रूक (ता. माढा) येथील शेतकरी संतोष नारायण जाधव यांनी दाखवून दिले आहे. अवघ्या अडीच एकरात त्यांनी २४१ उसाचे उत्पन्न घेतले आहे.

उपळाई बुद्रूक हा कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा. परंतु, गेली दोन ते तीन वर्षांपासून या भागात सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी पोहोचत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी ऊस लागवड, बागायतीकडे वळला आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर या भागात शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली आहे. त्यातीलच एक म्हणजे शेतकरी संतोष जाधव.

हेही वाचा: मराठा आरक्षणासाठी पुणे-मुंबई लॉंगमार्च : संभाजीराजे यांचा इशारा

पुरेसे पाणी उपलब्ध झाल्याने त्यांनी दीड वर्षापूर्वी पहिल्यांदाच उसाची लागवड करण्यासाठी शेतीची पूर्ण मशागत करून त्यांनी लागवडीचे नियोजन केले. त्यांनी ८६०३२ गोल्डन या ऊस बेण्याची लागवड केली. सरी पद्धतीने चार बाय चार अंतरावर दोन डोळे, ऊस बेण्याची त्यांनी लागवड केली होती. उगवणीनंतर २० ते २५ दिवसांनी रासायनिक खताचा पहिला डोस त्यांनी वापरला.

स्वतःचे वैयक्तिक कौशल्य वापरत त्यांनी योग्य नियोजन केल्याने, उसावर कीड, माशी, पांढरी माशी या कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. संतोष जाधव यांच्या कष्टाचे चीज झाले असून, त्याच्या उसाच्या एका बुडास जवळपास २२ उसाचे फुटवे होऊन ५० काड्यांचा ऊस निघाला आहे. साधारणपणे एका उसाचे वजन नऊ किलोपर्यंत आहे. अडीच एकर उस लागवडीचा पूर्ण खर्च त्यांना एक लाख रुपयांच्या आसपास झाला असून, उसाचे एकरी १०० टनाचे विक्रमी उत्पन्न त्यांनी घेतले आहे. सध्याच्या कारखाना भाव अंदाजे धरल्यास सहा लाख रुपयांच्या आसपास उत्पन्न त्यांना मिळाले आहे.

"पहिल्यांदाच ऊसाची लागवड केली. पै-पाहुण्यांचे यात बरेच मार्गदर्शन मिळाले. चांगले उत्पन्न मिळाल्याने, कुटुंबीयांने केलेल्या कष्टाचे फळ मिळाले आहे. इतका टन उसाचे उत्पादन मिळाल्याने आनंद वाटतोय."

- संतोष जाधव, शेतकरी, उपळाई बुद्रूक

loading image
go to top