Tim David : सिंगापूरचा खेळाडू थेट ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्डकप संघात; MI चेही आहे कनेक्शन

Tim David Selected In T20 World Cup Australian Team
Tim David Selected In T20 World Cup Australian Team esakal

T20I World Cup 2022 Australia Team : ऑस्ट्रेलियाने त्यांच्यात देशात खेळवल्या जाणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठीच्या संघाची घोषणा केली. याचबरोबर त्यांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय दौऱ्यावर जाणाऱ्या संघाची देखील घोषणा केली. ऑस्ट्रेलियाच्या या दोन्ही संघात सिंगापूरकडून (Singapore) खेळलेल्या टीम डेव्हिडची निवड करण्यात आली आहे. टीम डेव्हिड हा टी 20 स्पेशलिस्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. लांब लांब सिक्स मारण्यात त्याचा हातखंडा आहे. त्याने जगभरातील अनेक टी20 लीगमध्ये आपली गुणवत्ता दाखवून दिली होती. आयपीएलमध्ये देखील त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना आपला जलवा दाखवून दिला होता.

Tim David Selected In T20 World Cup Australian Team
'तेंडुलकर' कॅप्टन्सीचं पर्व पुन्हा अवतरणार; असं आहे Road Safety World Series चं वेळापत्रक

सिंगापूरकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा टीम डेव्हिड एक ना एक दिवस ऑस्ट्रेलियाकडून खेळले असे मानले जात होते. अखेर त्याने टी 20 वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळवले आहे. टीम डेव्हिडला आयपीएल मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने 8.25 कोटी खर्चून आपल्या संघात स्थान दिले होते. मात्र मुंबई इंडियन्सने त्याला पहिल्या तीन सामन्यात 1, 12 आणि 1 धाव केल्यानं ड्रॉप केलं होतं. मात्र मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर गेल्यानंतर टीम डेव्हिडला पुन्हा संधी मिळाली. त्यावेळी त्याने गुजरातविरूद्ध 21 चेंडूत 44, हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात 18 चेंडूत 46 तर दिल्ली विरूद्ध त्याने 11 चेंडूत 34 धावा करून आपली योग्यता सिद्ध करून दाखवली.

ज्यावेळी मुंबई इंडियन्सने त्याला करारबद्ध केले त्यावेळी तो ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही राज्य संघाकडून करारबद्ध झाला नव्हता. त्याने तोपर्यंत कोणताही प्रथम श्रेणी सामना देखील खेळला नव्हाता. अजूनपर्यंत त्याने एकही प्रथम श्रेणी सामना खेळलेला नाही.

Tim David Selected In T20 World Cup Australian Team
Hong Kong Open : हाँगकाँगमध्ये अजूनही कोरोना विलगीकरण, सलग तिसऱ्या वर्षी स्पर्धा रद्द

गेल्या आयपीएल हंगामात टीम डेव्हिडने मुंबईकडून 9 सामने खेळले. मात्र या 9 सामन्यात त्याच्या वाट्याला फक्त 86 चेंडूत आले. जर प्रत्येकी 5 चेंडूंचा आधार घेतला तर टीम डेव्हिडचे स्ट्राईक रेट 216.28 इतके राहिले आहे. टीम डेव्हिडने मिळालेल्या 86 चेंडूत 16 षटकार मारत आपल्या बॅटिंगमध्ये काय क्षमता आहे याची चुणूक दाखवून दिली होती. आता तो ऑस्ट्रेलियाकडून टी 20 वर्ल्डकप खेळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com