जोहान्सबर्ग कसोटीची घंटी वाजणारी सिपोकाजी आहे तरी कोण? | Sipokazi Sokanyile | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sipokazi Sokanyile
जोहान्सबर्ग कसोटीची घंटी वाजणारी सिपोकाजी आहे तरी कोण? | Sipokazi Sokanyile

जोहान्सबर्ग कसोटीची घंटी वाजणारी सिपोकाजी आहे तरी कोण?

जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa vs India) यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून जोहान्सबर्गवर सुरु होत आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. भारताने (Indian Cricket Team) हा सामना जिंकला तर भारत दक्षिण आफ्रिकेत आपला पहिला कसोटी मालिका विजय साजरा करेल. तर दक्षिण आफ्रिकेला (South Africa National Cricket Team) ही मालिका वाचवायची असेल तर त्यांना सामना जिंकणे किंवा ड्रॉ करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे जोहान्सबर्ग कसोटी ही पहिल्या क्षणापासूनच उत्कंठावर्धक होणार आहे. या उत्कंठावर्धक सामन्याची सुरुवात देखील विशेष होणार आहे.

जोहान्सबर्ग (Johannesburg) कसोटीची सुरुवात मीडिया मॅनेजर सिपोकाजी सोकानिले (Sipokazi Sokanyile) मैदानावरील घंटी वाजवून करणार आहे. सोकानिले चा जन्म इस्टर्न केपमध्ये झाला आहे. आयसीसीने (ICC) सोकानिलेची लॉर्ड्स, साऊथाहॅम्पटन, ट्रेंड ब्रीज, समरसेट आणि मॅचेस्टरमध्ये वर्ल्डकप सामन्यादर्म्यान मीडिया मॅनेजर म्हणून नियुक्ती केली होती.

हेही वाचा: दुसऱ्या कसोटीपूर्वी राहुल द्रविडचे पुजाराबाबत महत्वाचे वक्तव्य

आफ्रिकी मीडिया मॅनेजर सिपोकाजी सोकनिले (Sipokazi Sokanyile) ही आपल्या कामाबरोबरच आपल्या सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते. सोकनिले सोशल मीडियावरही फार अॅक्टिव्ह असते. तिने आपली काही आकर्षक छायाचित्रे आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहेत.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. त्यातील पहिल्या सेंच्युरियन कसोटीत भारताने 113 धावांनी विजय मिळवून मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या जोहान्सबर्ग कसोटीत भारत मालिका विजयासाठी खेळेल तर दक्षिण आफ्रिका मालिकेतील (South Africa) आव्हान कायम ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top