esakal | SL vs IND: श्रीलंकन ताफ्यातील आणखी एकाला कोरोना
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Lanka Cricket Team

SL vs IND: श्रीलंकन ताफ्यातील आणखी एकाला कोरोना

sakal_logo
By
सुशांत जाधव

कोलंबो: भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेपूर्वी श्रीलंकन ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झालाय. बॅटिंग कोच ग्रँट फ्लावर यांच्यानंतर आणखी एका स्टाफ सदस्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला आहे. श्रीलंकन क्रिकेट संघाचे डाटा विश्लेषक जीटी निरोशन हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बोर्डाने शुक्रवारी यासंदर्भातील माहिती दिलीये. भारत-श्रीलंका यांच्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी श्रीलंकन ताफ्यातील दुसऱ्या सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. ही गोष्ट मालिकेची चिंता वाढवणारी आहे. (SL vs IND After Batting Coach Grant Flowersri Lankas Data-Analyst Covid 19 Positive)

श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या निवेदनानुसार, श्रीलंकेच्या राष्ट्रीय टीमसोबत असलेल्या डाटा विश्लेषक जीटी निरोशन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ग्राँट फ्लावर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्व खेळाडू आणि स्टाफ सदस्यांची आरटी- पीसीआर टेस्ट घेण्यात आली. यावेळी जीटी निरोशन यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मेडिकल प्रोटोकॉलनुसार, निरोशन यांच्यावर उपचार सुरु आहेत.

श्रीलंका आणि भारत यांच्यात तीन-तीन सामन्यांची वनडे आणि टी-20 मालिका नियोजित आहे. 13 जूलैला वनडे सामन्याने भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याला सुरुवात होणार आहे. श्रीलंका टीम इंग्लंड दौऱ्यावरुन परतल्यानंतर 48 तांसात बॅटिंग कोच ग्राँड फ्लावर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

हेही वाचा: End vs PAK 1st ODI : नवख्या इंग्लंड संघानं उडवला पाकचा धुव्वा

शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावरील क्वारंटाईन कालावधी पूर्ण करुन कसून सरावाला सुरुवातही केल्याचे पाहायला मिळाले होते. या दौऱ्याची सर्वांनाच उत्सुकता असताना श्रीलंकन ताफ्यातील कोरोनाच्या शिरकावाने मालिकेवर संकटाचे सावट दिसून येत आहे.

हेही वाचा: दादाच्या ऑल टाईम इलेव्हनमध्ये पाकिस्तानी क्रिकेटला जागा नाही

इंग्लंड दौऱ्यावर श्रीलंका संघ ज्या संघासोबत मैदानात उतरला होता त्या इंग्लिश संघातील 3 खेळाडू आणि स्टाफ सदस्यांपैकी 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. इंग्लंड आणि वेल्स बोर्डाने आपल्या सर्व खेळाडूंना क्वारंटाईन करत पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली नवा पर्यायी संघ मैदानात उतरवल्याचेही पाहायला मिळाले. श्रीलंकन बोर्डालाही असाच काही पर्याय अवलंबावा लागणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

loading image