esakal | दादाच्या ऑल टाईम इलेव्हनमध्ये पाकिस्तानी क्रिकेटला जागा नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Sourav Ganguly

दादाच्या ऑल टाईम इलेव्हनमध्ये पाकिस्तानी क्रिकेटला जागा नाही

sakal_logo
By
सुशांत जाधव

Sourav Ganguly's All Time XI: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने ऑल टाईम प्लेइंग इलेव्हनची निवड केलीये. आपल्या या प्लेइंग इलेव्हनचे कॅप्टन म्हणून त्याने ऑस्ट्रेलियन रिकी पाँटिंगला पसंती दिलीये. या संघात त्याच्या समकालीन दोन भारतीयांना संघात स्थान मिळाले असून पाकिस्तानी क्रिकेट संघातील एकालाही दादाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतलेले नाही.

गांगुलीने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडच्या युट्यूब चॅनेलवरील कार्यक्रमात आपली फेवरिट ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन सांगितली. अष्टपैलू मॅथ्यू हेडन आणि कुकला त्याने डावाची सुरुवात करण्यासाठी निवडले. तिसऱ्या स्थानावर त्याने राहुल द्रविडला स्थान दिले असून चौथ्या क्रमांकासाठी त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावाला पसंती दिलीये. दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिसला त्याने अष्टपैलू म्हणून निवडले आहे. विकेट किपर म्हणून गांगुलीने श्रीलंकेच्या कुमार संगकाराला पसंती दिली आहे.

हेही वाचा: ENG vs PAK: पाकिस्तानचा हिरो ठरला झिरो; व्हिडिओ होतोय व्हायरल

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिक पाँटिंगला त्याने आपल्या या ड्रिम इलेव्हन ऑल टाईमच कॅप्टन बनवले आहे. जलदगती गोलंदाजीचा धूरा ग्लेन मॅग्रा आणि डेल स्टेन तर फिरकीसाठी शेन वॉर्न आणि मुरलीधरन यांच्या नावाचा समावेश आहे.

हेही वाचा: ऑलिम्पिकपूर्वी जपानमध्ये 'व्हायरस इमर्जन्सी'

सौरव गांगुलीने निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये (Ganguly's All Time XI) ऑस्ट्रेलियाचे 4, दक्षिण आफ्रिकेच्या संघातील 2, भारतीय संघातील 2 आणि श्रीलंकेच्या संघातील 2 आणि इंग्लंडमधील एकाचा समावेश आहे.

गांगुलीची ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन

मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया), अ‍ॅलिस्टर कुक (इंग्लंड), राहुल द्रविड (भारत), सचिन तेंडुलकर (भारत), जॅक कॅलिस (दक्षिण अफ्रीका), कुमार संगकारा (श्रीलंका), रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया, कर्णधार), ग्लेन मॅग्रा (ऑस्ट्रेलिया) ), शेन वार्न (ऑस्ट्रेलिया), मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका), डेल स्टेन (दक्षिण अफ्रीका)

loading image