SL vs IND :..अन् गब्बरनं ठोकला शड्डू; व्हिडिओ होतोय व्हायरल

त्यावेळी शिखर धवनला आनंद लपवता आला नाही
 Team India Captain Shikhar Dhawan
Team India Captain Shikhar Dhawan Twitter

Sri Lanka vs India, 3rd ODI : श्रीलंका विरुद्धच्या वनडे मालिकेत शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2-1 अशी बाजी मारली. अखेरच्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात टॉस जिंकल्यानंतर सामना जिंकण्यात टीम इंडियाला अपयश आले. पण ज्यावेळी टॉस जिंकला त्यावेळी शिखर धवनला आनंद लपवता आला नाही. त्याने आपल्या खास शैलीत शड्डू ठोकत टॉस जिंकल्याचा आनंद व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (SL vs IND Team India Captain Shikhar Dhawan Celebrates After Winning Toss Video Goes Viral)

भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीप्रमाणेच सुरुवातीच्या काळात शिखर धवनलाही टॉस जिंकण्यात अपयश आल्याचे पाहायला मिळाले. पहिल्यांदाच भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या शिखर धवनने पहिल्या दोन सामन्यात टॉसच जिंकता आला नव्हता. त्याने टॉस गमावूनही भारतीय संघाने त्या दोन्ही सामन्यात विजय नोंदवत मालिका दिमाखात खिशात घातली होती. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात धवनने टॉस जिंकल्यावर शड्डू मारुन सेलिब्रेशन केले. पण हा सामना भारतीय संघाने गमावला. शिखर धवनला पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देऊन खास विक्रम आपल्या नावे नोंदवण्याची संधी होती. पण त्याची ती संधी आता हुकली आहे.

 Team India Captain Shikhar Dhawan
SLvsIND : सूर्यासमोर श्रीलंकन बॉलरचा पोपट; व्हिडिओ एकदा पाहाच!

भारतीय संघ तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेसाठी मोठा बदलासह मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. प्लेइंग इलेव्हनमधील 5 जणांनी या सामन्यातून वनडे पदार्पण केले. यात संजू सॅमसन, नीतीश राणा, चेतन सकारिया, कृष्णाप्पा गौथम, राहुल चाहर यांचा समावेश होता.

टीम इंडियात 5 जणांनी पदार्पण एकाच वेळी पदार्पण करण्याची ही दुसरी वेळ होती. यापूर्वी डिसेंबर 1980 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडेत दिलीप दोषी, कीर्ति आझाद, रोजर बिन्नी, संदीप पाटील आणि टी श्रीनिवासन यांनी एकाच वेळी पदार्पण केले होते. श्रीलंकेविरुद्धचा अखेरचा सामना गमावला असला तरी वनडे मालिका ही भारताच्याच नावे झाली. यानंतर आता 3 सामन्यांची टी-20 मालिका रंगणार आहे. यातही काही नवख्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

 Team India Captain Shikhar Dhawan
Olympics : कधी महिला खेळाडूंची बिकीनी तर कधी शॉर्टवरुन रंगते चर्चा

टी-20 मालिका वेळापत्रक

कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर 25 जुलै रोजी पहिला टी-20 सामना खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर 27 जुलैला दुसरा तर 29 जुलै रोजी भारताच्या श्रीलंका दौऱ्याची सांगता होईल. या मालिकेत विजयाच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com