Olympics : कधी महिला खेळाडूंची बिकीनी तर कधी शॉर्टवरुन रंगते चर्चा

ती खूपच तोकडे कपडे घालते, असा प्रश्न उपस्थितीत करण्यात आला
Olivia Breen
Olivia Breen File Photo

वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर अखेर क्रीडा क्षेत्रातील महाकुंभ मेळ्याला सुरुवात झालीये. 205 देशांतील जवळपास 11 हजार खेळाडू टोकियो स्पर्धेत सहभागी झाले आहेत. 43 ठिकाणी रंगणारी स्पर्धा ही प्रेक्षकाविना रंगणार आहे. टोकियोतील ऑलिम्पिक स्पर्धेत कोणता देश सर्वाधिक पदके जिंकणार? कोणत्या देशातील खेळाडू खास रेकॉर्ड आपल्या नावे करणार हे जस जसे इव्हेंट होतील तसे समोर येईल. ऑलिम्पिकच्या स्पर्धेच्या पूर्वी महिला खेळाडूंच्या ड्रेस कोडवरुन काही चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. (tokyo olympics 2020 you know controversy over a female-athletes bikini and shorts sometimes )

18 जुलै रोजी इंग्लंडमील बेडफॉर्डमधील लांब उडी स्पर्धेत पॅरा ऑलिम्पिकची सुवर्णपदक विजेती ओलिविया ब्रीन हिच्या कपड्यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले होते. लांब उडी क्रीडा प्रकारात पॅरा ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा सुवर्ण कामगिरी करणारी खेळाडू खूप तोकडे कपडे घालते, असा प्रश्न उपस्थितीत करण्यात आला होता. यापूर्वी नॉर्वेच्या महिला बीच हँडबॉल टीम खूप लांबलचक कपडे वापरतात, असा प्रश्न उपस्थितीत करण्यात आला होता.

Olivia Breen
Olympics Ceremony : निर्बंधातही उत्साह दर्शवणारे खास क्षण

ओलिविया ब्रीनने फ्रान्सच्या स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये वादग्रस्त चर्चेवर भाष्यही केले होते. तोकड्या कपड्यांवरुन शॉर्ट घालण्याचा सल्ला दिल्याचा किस्सा तिने शेअर केला होता. सध्याच्या घडीला खेळाच्या मैदानात मी जे कपडे वापरते त्याने माझे अंग अधिक उघडे दिसते. संबंधित अधिकाऱ्याने शॉर्ट घालण्याचा सल्ला दिल्याने आश्चर्य वाटले, असेही ती म्हणाली होती. महिला खेळाडूंनी मैदानात कोणते कपडे वापरावे यावरुन नेहमीच चर्चा केली जाते. महिलांप्रमाणे पुरुषांनाही ड्रेस कोड करणार आहात का? असा तिखर प्रश्न तिने ट्विटरच्या माध्यमातूनही उपस्थितीत केला होता.

Olivia Breen
Olympics : 'जखमी वाघीण' पदकाचं स्वप्न साकार करण्याची अपेक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com