SL vs ZIM ODI : सामना सुरू होण्याच्या काही तास आधी संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू डेंग्यूमुळे रुग्णालयात दाखल अन्...

Sri Lanka vs Zimbabwe ODI Series maerathi news
Sri Lanka vs Zimbabwe ODI Series maerathi news

Sri Lanka vs Zimbabwe ODI Series : श्रीलंका क्रिकेट संघ आजपासून घरच्या मैदानावर झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. मालिकेतील पहिला सामना सुरू होण्याच्या काही तास आधी संघाला मोठा धक्का बसला. संघाचा स्टार फलंदाज पथुम निसांकाला डेंग्यूमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sri Lanka vs Zimbabwe ODI Series maerathi news
अवघ्या 7 धावांनी हुकले द्विशतक...! भारतीय निवडसमितीने दुर्लक्ष केलेल्या खेळाडूंची षटकार-चौकारची आतषबाजी

श्रीलंका क्रिकेटने पथुम निसांका या एकदिवसीय मालिकेतून बाहेर असल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करून दिली. ज्यात त्यांनी म्हटले की, निसांकाला डेंग्यूमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणि त्यामुळे तो झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर गेला आहे. त्याच्या जागी निवड समितीने 19 वर्षीय खेळाडू शेव्हॉन डॅनियलचा संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sri Lanka vs Zimbabwe ODI Series maerathi news
T20 World Cup : 'किती पैशांची गरज आहे ते सांगा....' IND vs PAK एकाच ग्रुपमध्ये पाहून 'या' क्रिकेट बोर्डाने ICC ला डिवचलं

डॅनियलने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याला अजून वनडे फॉरमॅटमध्ये पदार्पण कराचे आहे. डॅनियल देखील एक सलामीवीर फलंदाज आहे. त्यामुळे त्याला संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण संघाकडे कर्णधार कुसल मेंडिस आणि अविष्का फर्नांडोच्या रूपाने दोन सलामीवीर आहेत.

या मालिकेतील सर्व सामने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी श्रीलंका क्रिकेटने झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली होती, ज्यामध्ये कुसल मेंडिसला या फॉरमॅटमध्ये संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आला होता, तर दासून शनाकाचे खेळाडू म्हणून पुनरागमन झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com