Sri Lanka Cricket| श्रीलंकेला विश्वविजेता बनवणाऱ्या कर्णधाराला 2 अब्जांचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Lanka Cricket

श्रीलंकेला विश्वविजेता बनवणाऱ्या कर्णधाराला 2 अब्जांचा दंड; जाणून घ्या, काय कारण?

श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि संघाचा माजी क्रिकेटपटू अर्जुन रणतुंगा यांच्यातील वाद चिघळला आहे. श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने माजी कर्णधार रणतुंगा यांनी खोटे आणि अपमानजनक वक्यव्य केल्याने त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याच्या निर्णय बोर्डने घेतला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.(SLC Officials Seek Rs 2 Billion Damages from Arjuna Ranatunga for Alleged Loss of Reputation)

श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनी अर्जुन रणतुंगा यांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये रणतुंगांना २ अब्ज (दोनशे कोटी श्रीलंकन रूपये) रूपयांचा दंड भरण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डने त्यांच्यावर खोटे आणि अपमानजनक विधाने केल्याचा आरोप लावत दंड भरण्यास सांगितले आहे. रणतुंगा हे श्रीलंकेच्या राष्ट्रीय खेळ परिषदेचे अध्यक्ष आहेत. कार्यकारी समितीने त्यांना लेटर ऑफ डिमांड पाठवले आहे.

हेही वाचा: IND vs ZIM: झिम्बाब्वेमध्ये भारतीय खेळाडूंना अंघोळ करण्यास बंदी, जाणून घ्या का?

एसएलसीने त्यांच्या विधानात म्हटले, एसएलसी कार्यकारी समितीने घेतलेल्या बैठकीत रणतुंगा यांनी खोटे, अपमानजनक आणि विचित्र विधाने केले त्यावर विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. त्यानंतरच त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याचा निर्णय पक्का करण्यात आला. तसेच या विधानात पुढे म्हटले गेले की, रणतुंगा यांनी केलेल्या विधानामुळे एसएलसीची प्रतिमा आणि प्रतिष्ठेला धक्का पोहचून त्याचे नुकसान झाले.

हेही वाचा: प्रफुल्ल पटेलांमुळे FIFA ने भारतीय संघावर बंदी घातली? चर्चांना उधाण

रणतुंगा यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेची कामगिरी

श्रीलंका क्रिकेट संघाने रणतुंगा यांच्या कर्णधारपदाखाली 1996 मध्ये वनडे विश्वचषक जिंकला होता. ते त्यांच्याकाळातील सर्वोत्कृष्ठ फलंदाज होते. त्यांना श्रीलंकेला परदेशी भुमिवर सामने जिंकण्यास शिकवले. त्यांनी श्रीलंकेकडून 93 कसोटी सामन्यात 5105 धावा आणि 16 विकेट्स घेतल्या. तसेच 269 वनडे सामन्यात 7456 धावा करताना 79 विकेट्स घेतल्या. त्यांनी या दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये प्रत्येकी 4-4 शतके केली.

Web Title: Slc Officials Seek Rs 2 Billion Damages From Arjuna Ranatunga For Alleged Loss Of Reputation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..