FIFA Ban | प्रफुल्ल पटेलांमुळे FIFA ने भारतीय संघावर बंदी घातली? चर्चांना उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Praful Patel Sharad Pawar
प्रफुल्ल पटेलांमुळे FIFA ने भारतीय संघावर बंदी घातली? चर्चांना उधाण

प्रफुल्ल पटेलांमुळे FIFA ने भारतीय संघावर बंदी घातली? चर्चांना उधाण

भारतीय फुटबॉलसाठी आजचा दिवस काळा दिवस म्हणून मानला जात आहे. फुटबॉलची जागतिक संघटना फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर बंदी लादली आहे. त्यामुळे ही बंदी उठेपर्यंत भारतीय फुटबॉल संघ कोणतेही सामने खेळू शकणार नाहीत. आता याला राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांना जबाबदार धरलं जात आहे. (Praful Patel FIFA)

हेही वाचा: FIFA Suspends AIFF : FIFA कडून अखिल भारतीय फुटबॉल महासंघ निलंबित

FIFA ने भारतीय फुटबॉल संघावर घातलेल्या बंदीमुळे आता भारत कोणतेही सामने खेळू शकणार नाही. येत्या ऑक्टोबरमध्ये महिलांचा अंडर १७ वर्ल्ड कप होणार होता, मात्र आता तेही होणार नाही. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल या सगळ्या वादाला कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा: राष्ट्रवादीला मोठा धक्का! ईडीकडून प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त

२००९ मध्ये प्रफुल्ल पटेल यांना भारतीय फुटबॉल महासंघाचा अध्यक्ष बनवण्यात आलं होतं. २०२२ मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाने पदावरुन काढून टाकलं होतं. भारतीय क्रीडा संहितेनुसार कोणतीही व्यक्ती ३ पेक्षा जास्त वेळा अध्यक्ष राहू शकत नाही. मात्र प्रफुल्ल पटेल राज्य संघटनांच्या मदतीने निवडणुका होऊ देत नाहीयेत, असा त्यांच्यावर आरोप आहे. तसंच त्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. प्रफुल्ल पटेल यांना पदावरुन हटवल्यानंतरच याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या होत्या, असेही आरोप होत आहेत. ट्विटरवर सध्या Praful Patel ट्रेंडिंग आहेत.

Web Title: Ncp Leader Prafull Patel Is The Reason Behind Ban On Indian Football Team By Fifa

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..