Smriti Mandhana : आशिया कपमधील सप्तपदी पूर्ण! एकट्या स्मृती मानधनाने कुटल्या 51 धावा

Smriti Mandhana Aggressive Half Century India Won Women's Asia Cup
Smriti Mandhana Aggressive Half Century India Won Women's Asia Cup esakal

Women's Asia Cup T20 2022 India Women vs Sri Lanka Women : भारताने श्रीलंकेचे 66 धावांचे आव्हान 8 फलंदाज आणि 11 षटके राखून पार करत महिला आशिया कपवर सातव्यांदा कब्जा केला. भारताकडून सलामीवीर स्मृती मानधनाने 25 चेंडूत 51 धावांची धडाकेबाज खेळी केली. भारताच्या 71 धावांमधील 51 धावा एकट्या स्मृती मानधनाने केल्या. भारताकडून रेणुका सिंहने भेदक मारा करत 3 विकेट्स मिळवल्या.

Smriti Mandhana Aggressive Half Century India Won Women's Asia Cup
T20 World Cup : सर्व कर्णधारांनी मिळून अश्विनची केली गोची; भारतीय कर्णधार काय करणार?

भारताने लंकेचे 66 धावांचे आव्हान पार करताना आक्रमक सुरूवात केली. सलामीवीर स्मृती मानधनाने आक्रमक फटकेबाजी करत भारताला 3 षटकात 25 धावांपर्यंत पोहचवले. मात्र लंकेनेही भारताला पाठोपाठ दोन धक्के दिले.

झुंजार फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेच्या रणवीराने गोलंदाजीतही चमक दाखवत भारताला पहिला धक्का दिला. तिने 8 चेंडूत 5 धावा करणाऱ्या शेफाली वर्माला पॅव्हेलियनमध्ये धाडले. कविशा दिलहारीने भारताला दुसरा धक्का दिला. इन फॉर्म जेमिमाह रॉड्रिग्जचा 2 धावेवर त्रिफळा उडवला.

Smriti Mandhana Aggressive Half Century India Won Women's Asia Cup
Babar Azam Birthday : बाबरचा बर्थडे झाला खास; सेलिब्रेशनला 16 कर्णधारांची लाभली साथ!

तत्पूर्वी, श्रीलंकेसाठी रेणुका सिंह टाकत असलेले चौथे षटक एक वाईट स्वप्नासारखे ठरले. या षटकात लंकेने तब्बल तीन विकेट्स गमावल्या. रेणुका सिंहने चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हर्षता मादवली 1 धावेवर बाद केले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर अनुष्का संजिवनी 2 धावांची भर घालून धावबाद झाली. रेणुकाने पाचव्या चेंडूवर हसिनी परेराला शुन्यावर बाद करत लंकेची अवस्था बिनबाद 8 वरून 4 बाद 9 अशी केली. यानंतर रेणुकाने सहाव्या षटकात कविशा दिलहारीचा 1 धावेवर त्रिफळा उडवला. यामुळे लंकेची अवस्था 5 बाद 16 धावा अशी झाली.

यानंतर राजेश्वरी गायकवाडने लंकेला अजून खोलात नेले. तिने निलाक्षी डिसेल्वाला 6 धावांवर बाद करत लंकेला सहावा धक्का दिला. या बरोबरच मलिशा शेहानीला स्नेह राणाने शुन्यावर बाद करत श्रीलंकेची अवस्था 7 बाद 25 धावा अशी केली. लंकेचा संघ आशियाकपच्या अंतिम सामन्यात 50 धावांपार्यंत तरी मजल मारतो का नाही अशी स्थिती निर्माण झाली होती.

दरम्यान, स्नेह राणा आणि राजेश्वरी गायकवाड या दोघींनी लंकेच्या शेपटाला फारशी वळवळ करू दिली नाही. या दोघींनी लंकेची अवस्था 9 बाद 43 धावा अशी केली. लंकेची शेवटची जोडी इनोका आणि अचिनी यांनी लंकेला कसेबसे अर्धशतक पार करून दिले. विशेष म्हणजे या दोघींना शेवटच्या षटकापर्यंत झुंज देत लंकेचा ऑल आऊट होऊ दिला नाही. इनोकाने 22 चेंडूत 18 धावांची खेळी करत लंकेला 65 धावांपर्यंत पोहचवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com