ICC Ranking : स्मृती अन् दिप्तीनं केली कारकिर्दितील सर्वोत्तम कामगिरी!

Smriti Mandhana deepti Sharma Reached Career Best ICC T20 Women's Ranking
Smriti Mandhana deepti Sharma Reached Career Best ICC T20 Women's Rankingesakal

ICC T20 Women's Ranking : भारताची सलामीवीर स्मृती मानधना आणि अष्टपैलू खेळाडू दिप्ती शर्मा यांनी आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये आपली आतापर्यंतच्या कारकिर्दितील सर्वोत्तम कामगिरी केली. स्मृती मानधनाने फलंदाजीच्या क्रमवारीत तर दिप्ती शर्माने गोलंदाजांच्या क्रमवारीत अनुक्रमे एक - एक स्थानांची सुधारणा केली. स्मृती मानधना वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर राहिली आहे. दरम्यान, आशिया कपमध्ये दमदार फलंदाजी करत तिने टी 20 रँकिंगमध्ये आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली.

Smriti Mandhana deepti Sharma Reached Career Best ICC T20 Women's Ranking
Roger Binny : नवे BCCI अध्यक्ष बुमराहचे नाव घेऊन म्हणाले, सर्वात आधी...

नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी टी 20 महिला फलंदाजी रँकिंगमध्ये स्मृती मानधना 730 रेटिंग प्राप्त केले आहे. ती अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीच्या फक्त 13 पॉईंट मागे आहे. तर आशिया कपमध्ये आपल्या फिरकी गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केलेल्या दिप्ती शर्माला गोलंदाजीत 742 रेटिंग मिळाले आहे. ती गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

Smriti Mandhana deepti Sharma Reached Career Best ICC T20 Women's Ranking
SL vs UAE | VIDEO : कार्तिक मयप्पन चेन्नईतून पोहचला युएईत! केली लंकेविरूद्ध ऐतिहासिक 'हॅट्ट्रिक'

दिप्ती शर्मा गोलंदाजीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असणाऱ्या इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोन आणि दिप्ती शर्मा यांच्यात फक्त फक्त 14 अंकांचा फरक आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या रँकिंगमध्ये दिप्ती शर्मा 370 रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. या यादीत न्यूझीलंडची सोफी डिव्हाईन (390) आणि वेस्ट इंडीजची हेले मॅथ्यूज (377) या अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com