NZ v IND: स्मृती मानधना संघाबाहेरच; भारताला मोठा धक्का

Smriti Mandhana may miss 1st ODI against New Zealand
Smriti Mandhana may miss 1st ODI against New Zealand esakal

भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज स्मृती मानधना (Smriti Mandhana) न्यूझीलंड (New Zealand women's national cricket team) विरूद्धच्या एकमेव टी 20 सामन्याला मुकली होती. न्यूझीलंडमधील कडक विलगीकरणाच्या नियमामुळे भारतीय संघातील (India women's national cricket team) अनेक खेळाडू टी 20 सामन्यात खेळू शकले नाहीत. आज न्यूझीलंडमध्ये झालेला हा टी 20 सामना भारताने 18 धावांनी गमामवला. आता स्मृती मानधना टी 20 ( Twenty20) सामन्याबरोबरच पहिल्या वनडे सामन्यालाही मुकण्याची दाट शक्यता आहे.

स्मृती मानधना बरोबरच भारतीय संघातील मेघना सिंग आणि रेणुका सिंग या देखील विलगीकरणात आहेत. त्याही टी 20 सामन्यात खेळू शकल्या नव्हत्या. आज ( दि. 9) झालेल्या टी20 सामन्यात मानधनाच्या जागी यस्तिका भाटिया सलामीला उतरली होती.

Smriti Mandhana may miss 1st ODI against New Zealand
ICC Women ODI Rankings : स्मृती मानधनाची उडी; मिताली राज जैसे थे!

याबाबत बोलताना यस्तिकाने व्हर्च्युअल पोस्ट मॅच पत्रकार परिषदेत सांगितले की, 'स्मृती, मेघना सिंग आणि रेणुका सिंग या न्यूझीलंड सरकारच्या कडक नियमानुसार (New Zealand government MIQ) अजूनही विलगीकरणात आहेत. सध्याच्या घडीला आम्ही इतकेच सांगू शकतो.' दरम्यान, याबाबत बीसीसीआयकडून (BCCI) अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. न्यूझीलंडच्या प्रवासाबाबतच्या कडक नियामांमुळे या तीन खेळाडूंना फटका बसला आहे. त्यामुळे त्या अजूनही विलगीकरणात आहेत. पहिल्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर 155 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताला 20 षटकात 8 बाद 137 धावांपर्यंतच मजल मारता आली.

आता भारताचा 15 सदस्यांचा संघ 5 सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी क्वीन्सटाऊनला जाणार आहे.

Smriti Mandhana may miss 1st ODI against New Zealand
वृद्धीमान साहाने टीम इंडियाच्या नव्या मॅनेजमेंटमुळे घेतला मोठा निर्णय

न्यूझालंडमध्ये भारतीय संघातील कोणत्याही खेळाडूला कोरोनाची लागण (Corona Positive) झाल्याची अधिकृत माहिती अजून तरी समोर आलेली नाही. या संघाबरोबर दोन प्रशिक्षकही आहेत. भारत न्यूझीलंडविरूद्ध क्वीन्सटाऊनमध्ये 12 फेब्रुवारीपासून 5 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका न्यूझीलंडमध्ये मार्च महिन्यात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपच्या पूर्वतयारीसाठी महत्वाची मानली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com