पाकच्या घोळक्यात स्मृतीनं भारताचं नाव राखलं!

 smriti mandhana
smriti mandhana Sakal
Summary

आयसीसीच्या सर्वोत्तम टी 20 पुरुष संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळालेले नाही. दुसरीकडे पाकिस्तानच्या तिघांची वर्णी लागली आहे.

टी20 फॉर्मेटमध्ये भारतीय संघाची उप कर्णधार स्मृती मानधनाने 31.87 च्या सरासरीनं 255 धावा केल्या आहेत. 2021 मध्ये भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तिच्या नावे आहे. 25 वर्षीय स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) 9 सामन्यात दो अर्धशतक झळकावली आहेत. संघाच्या डावाला जबरदस्त सुरुवात करुन देताना तिने 131.44 च्या स्ट्राइक रेटनं धावा कुटल्या आहेत.

आयसीसीच्या (ICC) सर्वोत्तम महिला टी-20 संघात ती भारतीय (Indian) आहे. इंग्लंडच्या अनेक महिला खेळाडूंनी या संघात स्थान मिळवले आहे. इंग्लंडची अनुभवी ऑल राउंडर स्किव्हरने संपूर्ण वर्षात दमदार पदार्पण केल्याचे पाहायला मिळाले होते. आयसीसीच्या संघात स्मृती मानधनासह (Smriti Mandhana) इंग्लंडच्या टॅमी ब्युमोंट हिला सलामीला स्थान देण्यात आले आहे.

 smriti mandhana
रैना अन् त्याची मैना; स्विट कपलचा सोशल मीडियावर धुमाकूळ

डॅनी वाट, विकेटकीपर एमी जोन्स आणि स्पिनर सोफी एकलेस्टोन यांचाही संघात समावेश आहे. आयर्लंडची गैबी लुईस, दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोलवार्ट, शब्निम इस्माइल आणि मारिजेन कॅम्पसह झिम्बाब्वेच्या लॉरिन फिरी हिचाही आयसीसीच्या संघात समावेश आहे.

पुरुष संघात 3 पाकिस्तानी खेळाडू

आयसीसीच्या सर्वोत्तम टी 20 पुरुष संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळालेले नाही. दुसरीकडे पाकिस्तानच्या तिघांची वर्णी लागली आहे. पाकिस्तानचा कर्णधार कप्तान बाबर (Babar Azam) आझमची आयसीसीने कर्णधारपदी निवड केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या तिघांचा या संघात समावेश आहे. टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार कामगिरी केलेल्या मोहम्मद रिझवानसह गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा या संघात समावेश आहे. आस्ट्रेलियाला वर्ल्ड चॅम्पियन बवण्यात मोलाचा वाटा उचललेल्या अष्टपैलू मिशेल मार्श आणि जलदगती गोलंदाज जोश हेजलवुड यांनीही संघात स्थान मिळवले आहे. इंग्लंडचा जोस बटलर आणि बांगलादेशचा मुस्तफिझुर रहमान या संघात आहे.

 smriti mandhana
किंग कोहलीनं मोडला तेंडुलकरचा विक्रम; द्रविड गांगुलीलाही टाकले मागे

2021 मधील सर्वोत्तम महिला टी-20 संघ

स्मृती मानधना, टॅमी ब्युमोंट, डॅनी वाट, गॅबी लुईस, नॅट स्किव्हर (कर्णधार), एमी जोन्स, लॉरा वूलवार्ट, मारिजेन कॅम्प, सोफी एकलेस्टोन, लॉरिन फिरी आणि शब्निम इस्माइल.

2021 मधील सर्वोत्तम पुरुष टी-20 संघ

पुरुष: जोस बटलर, मोहम्मद रिझवान, बाबर आझम (कर्णधार), ऐडन मारकरम, मिशेल मार्श, डेविड मिलर, तबरेज शम्सी, जोश हेजलवुड, वानिंदु हसरंगा, मुस्तफिझुर रहमान आणि शाहीन शाह आफ्रिदी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com