Palash Muchhal reacts after wedding with Smriti Mandhana gets cancelled
esakal
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न रद्द झाले आहे. स्मृती मानधनाने सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. हे लग्न रद्द झाले असून यावर आता चर्चा करणं थांबवावं, असं आवाहन तिने केलं आहे. तसेच दोघांच्याही कुटुंबाच्या खासगी आयुष्याचा आदर करावा असंही तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. महत्त्वाचे म्हणजे तिच्या या पोस्टनंतर पलाश मुच्छलनेही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्याने त्याच्याविरोधात अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.