VIDEO : स्मृतीच्या कुकिंगवर हरमनप्रीतला नाय भरवसा

स्मृतीने व्हिडिओ शेअर करताच यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत असून कॅप्टन हरमनप्रितनेही स्मृतीची खेचण्याचा प्रयत्न केलाय. त्याला स्मृतीने चांगलेच उत्तर दिले.
Smriti Mandhana and Harmanpreet
Smriti Mandhana and Harmanpreet Instagram

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची फलंदाज स्मृती मानधन (Smriti Mandhana) ने इन्स्टाग्रामवर एक जुना पण खास व्हिडिओ शेअर केलाय. यात ती किचनमध्ये कुकिंगमध्ये व्यस्त असल्याचे दिसते. क्रिकेटच्या मैदानात आपल्या खास अंदाजाने लक्षवेधून घेणाऱ्या स्मृतीच्या या अंदाज पाहण्याजोगा असला तरी तिच्या संघातील चार चौघी तिची गंमत करतानाही या व्हिडिओमध्ये दिसते. यात भारतीय टी 20 संघाची कर्णधा हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur), राधा यादव (Radha Yadav) दिसतात. जेमिमा रोड्रिग्सने (Jemimah Rodrigues) हा क्षण कॅमेऱ्यात कैद केलाय. स्मृतीने व्हिडिओ शेअर करताच यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत असून कॅप्टन हरमनप्रितनेही स्मृतीची खेचण्याचा प्रयत्न केलाय. त्याला स्मृतीने चांगलेच उत्तर दिले.

ते दिवस खूपच भारी होते, जेव्हा माझ्या टीममधील मंडळी मी केलेले जेवण खाण्यासाठी उत्साहित असायची. कोरोनाच्या संकटकाळात त्या सर्व गोष्टी आठवत आहेत. लवकरच पुन्हा ते क्षण येतील. तोपर्यंत आपण सर्वांनी कोरोनाचा नियम पाळायला हवा. ही लढाई आपण निश्चित जिंकू, असा संदेश स्मृतीने दिला आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना हरमनप्रितने स्मृतीला चक्क आंटी म्हटले आहे. आंटी खाना बना रहीं हो या खिला रही हो? अशी प्रतिक्रिया हरमनप्रितने दिलीये. स्मृती आणि हरमनप्रित यांच्यात रॉड्रिग्जनेही खतराना एन्ट्री मारली. आम्हाला करपलेले खायला घालणार का तू? असा प्रश्न जेव्हा हरमनप्रित विचारते. तेव्हा स्मृती तिला माझ्या हातचे खायला लोक मरतात! असा रिप्लाय देते. यावेळी रॉड्रिग्जने स्मृतीला बाउन्सर मारल्यासारखा रिप्लाय दिलाय. तू केलेले खायला लोक मरतात की खाऊन मरतात? असे तिने म्हटले आहे.

सध्याच्या घडीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळ बंद आहेत. सर्व महिला खेळाडू आपापल्या घरी आहेत. एकमेकांना मिस करताना सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मंडळी आठवणीला उजाळा देताना दिसते. याचाच एक प्रकार स्मतीनेही आजमवला. तिच्या या व्हिडिओला तुफान पंसती मिळताना दिसते. भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com