VIDEO: स्मृतीची युवराजच्या तोडीची फिल्डिंग; पाहा अप्रतिम कॅच

Smriti Mandhana took Fabulous catch against new Zealand
Smriti Mandhana took Fabulous catch against new Zealand Esakal

क्वीन्सटाऊन: भारत आणि न्यूझीलंड (New Zealand W vs India W) यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना आज ( दि. 22) क्वीन्सटाऊनमध्ये खेळवला जात आहे. हा सामना पावसामुळे प्रत्येकी 20 षटकांचा करण्यात आला आहे. दरम्यान, कडक क्वारंटाईन काळ पूर्ण करून भारताची अघाडीची सलामीवीर स्मृती मानधना (Smriti Mandhana) संघात परतली आहे. तिने या सामन्यात जबरदस्त फिल्डिंग करत सर्वांनाच अवाक केले.

Smriti Mandhana took Fabulous catch against new Zealand
VIDEO: PSL मध्ये 'थप्पड़ की गूंज', हारिसकडून कामरानला गुलामासारखी वागणूक?

प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताकडून (New Zealand Women vs India Women) रेणुका सिंह सहावे षटक टाकत होती. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सोफी डिव्हाईनने एक जोरदार स्क्वेअर कट मारला. मात्र चेंडू हवेत राहिला. पॉईंटला फिल्डिंग करण्यासाठी उभ्या असलेल्या स्मृती मानधनाने हा चेंडू डाईव्ह मारत पकला. स्मृतीचा हा हवेत डाईव्ह मारून पकडलेला कॅच (Smriti Mandhana Fielding) पाहिल्यानंतर सर्वजण अवाक झाले.

Smriti Mandhana took Fabulous catch against new Zealand
पत्रकाराच्या धमकीवरून वृद्धीमान साहाचा बीसीसीआयला ठेंगा

डिवाईनने 24 चेंडूत 32 धावांची खेळी केली होती. चौथ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून न्यूझालंडला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. पावसामुळे सामना प्रत्येकी 20 षटकांचा करण्यात आला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने 20 षटकात 5 बाद 191 धावा उभारल्या आहेत. न्यूझीलंडकडून 33 चेंडूत 68 धावांची तर सूजी बेट्सने 26 चेंडूत 41 धावांची खेळी केली.

न्यूझीलंडने ठेवलेल्या 191 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने खराब फलंदाजी केली. भारताकडून रिचा घोष (52), मिताली राज (30) आणि स्मृती मानधना (13) या तिघींनाच दुहेरी आकडा पार करता आला. भारताचा संपूर्ण डाव 17.5 षटकात 128 धावात संपुष्टात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com