Wriddhiman Saha will not reveal the journalist name to the BCCI
Wriddhiman Saha will not reveal the journalist name to the BCCIesakal

पत्रकाराच्या धमकीवरून वृद्धीमान साहाचा बीसीसीआयला ठेंगा

भारताचा विकेटकिपर वृद्धीमान साहाने (Wriddhiman Saha) काही दिवसांपूर्वी त्याला पत्रकाराने (Journalist) मुलाखतीसाठी धमकी दिली होती असा खळबळजनक दावा केला होता. याबाबतच्या चॅटचे स्क्रीन शॉट देखील त्याने ट्विट (Tweet) केले होते. हे प्रकरण गांभिर्याने घेत बीसीसीआयने (BCCI) चौकशी करणार असल्याचे संकेत दिले होते. बीसीसीआय वृद्धीमान साहाला त्या पत्रकाराचे नाव विचारण्याची शक्यता होती. मात्र आता वृद्घीमान साहाने बीसीसीआयला ठेंगा दाखवत या प्रकरणात आपले तोंड बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Wriddhiman Saha will not reveal the journalist name to the BCCI)

Wriddhiman Saha will not reveal the journalist name to the BCCI
विक्रमादित्य सचिनकडून प्रज्ञानंदाच तोंडभरुन कौतुक

वृद्धीमान साहाने (Wriddhiman Saha) इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मला या प्रकरणात बीसीसीआयकडून कोणतीही विचारणा झालेली नाही. जर त्यांनी मला त्या पत्रकाराचे नाव उघड करण्यास सांगितले तर मी त्यांना सांगणार आहे की माझा कोणाचेही करियर उद्ध्वस्त करण्याचा उद्येश नाही. म्हणूनच मी माझ्या ट्विटमध्ये सुद्धा त्याचे नाव उघड केले नव्हते. माझ्या आई-वडिलांची तशी शिकवण नाही. माझ्या ट्विटचा मुख्य उद्येश हा माध्यमांमधील काहीजण कोणत्या थराला गेले आहेत हे दाखवून देण्याचा होता.'

Wriddhiman Saha will not reveal the journalist name to the BCCI
आधी PCB कडून सन्मान; आता ICC नं दाखवला वासिमचा 'आक्रमक' अंदाज

वृद्धीमान साहा पुढे म्हणाला की, 'जो काही प्रकार घडला तो काही चांगला नव्हता. ज्याने कोणी हे केले आहे त्याला हे चांगलेच माहिती आहे. मी यासंदर्भात ट्विट केले कारण मला खेळाडूंना अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरे जावे लागू नये. मला फक्त जे काही घडले ते चुकीचे होते. परत कोणी असला प्रकार करू नये हा संदेश द्यायचा होता.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com