डावललेल्या गोलंदाजाला आली धोनीची आठवण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhoni-Kuldeep

माही भाईच्या मार्गदर्शनाला मिस करतोय. माही भाई असताना चहल आणि मी एकत्र खेळायचो. तो नाही तेव्हापासून आम्ही एकत्र खेळलेलो नाही. आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळताना जेव्हा मला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही त्यावेळी खूप दु:ख झाले.

डावललेल्या गोलंदाजाला आली धोनीची आठवण

इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघापासून डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव संधी मिळण्यापासून पुन्हा एकदा वंचित राहिला. मागील सहा महिन्यात त्याला केवळ एक कसोटी आणि दोन वनडे सामन्यात संधी मिळाली. चायनामॅनकडे कर्णधार विराट कोहली दुर्लक्ष करतोय, अशा चर्चाही रंगल्याचे पाहायला मिळाले. टीम इंडियात स्थान मिळत नसल्याने बीसीसीआयसोबतच्या करार यादीतील त्याची ग्रेड खालावली. याशिवाय आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडूनही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यातही तो अपयशी ठरताना दिसले. (sometimes i miss ms dhonis guidance behind the wicket says kuldeep yadav)

हेही वाचा: भारतीयांच्या हॅटट्रिकनंतर पाक कॅप्टनचा लागला नंबर

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये कुलदीप यादवने खराब फॉर्म आणि संघातून गमावलेलं स्थान यासंदर्भात मनमोकळ्या गप्पा मारल्या. गोलंदाजीवेळी विकेटमागून महेंद्रसिंह धोनीचा सल्ला मिस करतोय, असेही त्याने म्हटले आहे. जोपर्यंत धोनी भारतीय संघाचा भाग होता तोपर्यंत चहल आणि कुलदीप जोडी संघाचा अविभाज्य घटक होती. एवढेच नाही या जोडीच्या कामगिरीचा संघाला फायदाही झाला. धोनीने ऑगस्टमध्ये आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि कुलदीप यादवची कामगिरी खालावत गेली. त्यामुळे टीम मॅनेजमेंट त्याच्यावर विश्वासही हळूहळू कमी झाला. त्याला कोणत्याही मोठ्या स्पर्धेत संघात स्थान देण्यात येत नाही असेच दिसते.

हेही वाचा: IPL स्पर्धेत संघ तळाला, पण माणुसकीत टॉपला!

कुलदीप धोनीविष्यही म्हणाला की, माही भाईच्या मार्गदर्शनाला मिस करतोय. माही भाई असताना चहल आणि मी एकत्र खेळायचो. तो नाही तेव्हापासून आम्ही एकत्र खेळलेलो नाही. आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळताना जेव्हा मला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही त्यावेळी खूप दु:ख झाले. मी इतकी वाईट कामगिरी करत आहे का? असा प्रश्न स्वत: पडल्याचे त्याने सांगितले. चेन्नईची खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल असताना मला संधी मिळाली नाही. तुम्ही मॅनेजमेंटला प्रश्न विचारु शकत नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला स्वत:ला प्रश्न विचारुन बॉलिंगवर फोकस करण्याचा प्रयत्न करत असल्याचे कुलदीपने म्हटले आहे. फेब्रुवारीमध्ये दोन वर्षानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात कुलदीपला संधी मिळाली. पण त्याला संधीच सोनं करता आले नाही. इंग्लंड विरुद्धच्या दोन वनडे सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही.

Web Title: Sometimes I Miss Ms Dhonis Guidance Behind The Wicket Says Kuldeep

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top