esakal | रैनाने CM योगींकडे केली ऑक्सिजन सिलिंडरची विनंती, अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

Suresh Raina

रैनाने CM योगींकडे केली ऑक्सिजन सिलिंडरची विनंती, अन्...

sakal_logo
By
सुशांत जाधव

Suresh Raina Aunt Covid-19 Positive : देशात कोरोनाचा कहर थांबण्याची चिन्हे दिसत नाही. प्रत्येक जण दहशतीखाली जगत आहे. जीवेघेण्या आजारातून वाचण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनचा तुटवडाही देशात जाणवतोय. भारतीय संघाचा माजी क्रिकेट आणि चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) ताफ्यातील प्रमुख खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) याच्या चुलतीला कोरोनाची लागण झालीये. त्यांना ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी सुरेश रैनाने सोशल मीडियावरील लोकप्रिय माध्यम असलेल्या ट्विटरच्या माध्यमातून मदत मागितली होती.

रैनाची चुलती 65 वर्षांची आहे. त्यांची परिस्थिती गंभीर असून त्यांना ऑक्सिजन सिलिंडरची नितांत गरज आहे, असे ट्विट सुरेश रैनाने केले होते. मेरठमधील रुग्णालयात त्याच्या चुलतीवर उपचार सुरु आहेत. रैनाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री CM योगी आदित्यनाथ यांच्यासह सार्वजनिकरित्या ऑक्सिजन सिलिंडरची मदत मिळावी, असे आवाहन केले होते.

हेही वाचा: आईसह बहीणसुद्धा गेली, कोरोनाने वेदावर कोसळला दु:खाचा डोंगर

रैनाच्या चुलतीला कोरोनाची लागण झाली असून लंग्ज इन्फेक्श झाले असून त्यांची ऑक्सिजन लेवल कमी झाली आहे. रैनाच्या ट्विटनंतर बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने रिप्लाय दिल्याचे पाहायला मिळाले. संपूर्ण माहिती पाठवा ऑक्सिजन सिलिंडर पाठवण्याची व्यवस्था करतो, असा तो म्हणाला. या सर्व परिस्थिती मेरठ पोलिस रैनाच्या मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी पीडितांच्या कुटुंबियांना दोन ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करुन दिले आहेत. एसएसपी अजय साहनीने ट्वीटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

हेही वाचा: ऑसी मालदीवला पोहचले, हसी-बालाजी एअर अ‍ॅम्बुलन्समधून चेन्नईला

2019 च्या हंगामात युएईच्या मैदानात रंगलेल्या आयपीएल स्पर्धेतून सुरेश रैनाने माघार घेतली होती. यंदाच्या हंगामात तो पुन्हा चेन्नईकडून खेळताना दिसला. कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे यंदाच्या हंगामातील स्पर्धा स्थगित करण्याची नामुष्की आयोजकांवर ओढावली आहे. रैनासह सर्वच खेळाडू घरी परतले.