साहाने चॅट उघड करताच गांगुलीचा मोठा भाऊ म्हणाला 'चूक' केलीस

sourav ganguly elder brother reaction after Wriddhiman Saha reveal private conversation
sourav ganguly elder brother reaction after Wriddhiman Saha reveal private conversation esakal

भारताचा विकेटकिपर वृद्धीमान साहाने (Wriddhiman Saha) बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीसोबतचे (Sourav Ganguly) व्हॉट्स अॅप चॅट सार्वजनिक केल्याने खळबळ उडाली होती. आता क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (CAB) सचिव असलेल्या सौरभ गांगुलीच्या मोठ्या भावाने या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. स्नेहाशीष गांगुली (Snehasish Ganguly) यांनी साहाने निवडसमिती, बीसीसीआयबरोबरचे वैयक्तिक चॅट सार्वजनिक करण्याची चूक केल्याचे सांगितले.

sourav ganguly elder brother reaction after Wriddhiman Saha reveal private conversation
दुखापत दीपकला, वेदना मात्र सीएसकेच्या वाढणार?

स्नेहाशीष गांगुली यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, 'हे माझे वैयक्तिक मत आहे. वृद्धीमान साहाचे निवडसमिती अध्यक्ष आणि बीसीसीआयमध्ये झालेले संभाषण हे वैयक्तिक होते. ते त्याने सार्वजनिक करायला नको होते. याचबरोबर त्याने रणजी ट्रॉफी खेळायला हवे होते. त्याने रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) न खेळण्याचे कारण वैयक्तिक असल्याचे सांगितले आहे. आम्ही त्याचा आदरच करतो. त्याच्यासाठी आमची दारे कायम उघडीच असतील. तो कधीही संघात सामील होऊ शकतो.' स्नेहाशीष गांगुली पुढे म्हणाला की, 'जोपर्यंत खेळाडू चांगली कामगिरी करत आहे तोपर्यंत त्याच्या वयाचा मुद्दा त्याच्या निवडीत आड येऊ नये.'

sourav ganguly elder brother reaction after Wriddhiman Saha reveal private conversation
भडकलेल्या वृद्धीमानच्या वक्तव्यावर द्रविडचे 'कूल' उत्तर

श्रीलंकेविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. वृद्धीमान साहाला कसोटी संघातून वगळण्यात आल्यानंतर त्याने माध्यमांसमोर बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीबरोबर (BCCI President Sourav Ganguly) झालेले चॅट उघड केले होते. तो म्हणाला होता की, 'न्यूझीलंड विरूद्धच्या कानपूर कसोटीत 61 धावांची खेळी केल्यानंतर दादीने (सौरभ गांगुली) त्याचे अभिनंदन केले आणि जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत तू संघात राहशील असे सांगितले. बीसीसीआय अध्यक्षांकडूनच असा मेसेज मिळाल्यामुळे माझा आत्विश्वास दुणावला होता. मात्र मला एक गोष्ट कळत नाहीये की इतक्या लवकर गोष्टी इतक्या झपाट्याने कशा काय बदलल्या?'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com