Sourav Ganguly : कहानी में ट्विस्ट! दादा BCCI अध्यक्षपदासाठीच इच्छुक

Sourav Ganguly expressed interest in continuing BCCI president Post
Sourav Ganguly expressed interest in continuing BCCI president Postesakal

BCCI President Election Sourav Ganguly : बीसीसीआय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेरच्या क्षणी एक ट्विट येण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली पुन्हा बीसीसीआय अध्यक्ष होण्यासाठी इच्छुक आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली नुकताच मुंबईत पोहचला आहे. यापूर्वी गेल्या आठवच्या त्याने बीसीसीआय पदाधिकाऱ्यांच्या दिल्लीत भेटीगाठी घेतल्या.

Sourav Ganguly expressed interest in continuing BCCI president Post
BCCI Election : रॉजर बिन्नी बिनविरोध BCCI अध्यक्ष होणार; राजीव शुक्लांनीच दिले संकेत

बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, 'सौरभ गांगुलीला IPL चेअरमन पदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र सौरभ गांगुलीने ती नम्रपणे नाकारली. त्याने तर्क दिला की बीसीसीआयचे सर्वोच्च पद भुषवल्यानंतर त्याच बीसीसीआयच्या एका उप समितीचे अध्यक्षपद भुषवणे त्याला मान्य नाही. त्याने बीसीसीआय अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यात यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.' मात्र सौरभ गांगुलीला बीसीसीआय अध्यक्षपदाची दुसरी टर्म देण्याचा प्रघात नाही असे सांगण्यात आले आहे.

Sourav Ganguly expressed interest in continuing BCCI president Post
IND vs SA : कुलदीप - सिराज सगळे गोलंदाज 'एकदम ओके', आफ्रिका 100 च्या आत घरात

दरम्यान, आज बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी 18 ऑक्टोबरला होणाऱ्या बीसीसीआयच्या सर्वसाधारण वार्षिक बैठकीत रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे बिनविरोध अध्यक्ष होण्याची शक्यता बोलून दाखवली. रॉजर बिन्नी यांच्याबरोबर जय शहांनी सचिवपदासाठी, राजीव शुक्लांनी पुन्हा उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या आशिष शेलार यांनी खजानीस पदासाठी अर्ज दाखल केला आहे. सौरभ गांगुलीने IPL चेअरमनपद नाकारल्यानंतर सध्याचे खजानीस अरूण सिंह धुमल यांना आयपीएल कार्यकारणीत मोठे पद (चेअरमन) मिळण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 11 आणि 12 ऑक्टोबर आहे. या अर्जांची छाननी 13 ऑक्टोबरला होईल त्यानंतर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com