Sourav Ganguly | BCCI अध्यक्षपदाचा राजीनामा देणार? गांगुलींचे नव्या इनिंगबाबत स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sourav ganguly launched worldwide educational app-and not resigned as a bcci president

BCCI अध्यक्षपदाचा राजीनामा देणार? गांगुलींचे नव्या इनिंगबाबत स्पष्टीकरण

माजी क्रिकेट संघाचा कर्णधार सौरव गांगुलीने बुधवारी एका ट्विटमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले. गांगुलीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्टही लिहिली होती. आता काहीतरी नवीन करणार असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं. बीसीसीआय अध्यक्षांच्या या ट्विटनंतर गांगुली आपल्या पदाचा राजीनामा देत आहे आणि लवकरच एका राजकीय पक्षात सामील होणार असल्याची चर्चा सुरू झाली. मीडियात बातम्या आल्या की ते भाजपमध्ये जाणार? मात्र, गांगुलीने आता या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. (sourav ganguly launched worldwide educational app-and not resigned as a bcci president)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गांगुलीने म्हटले आहे की, मी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही किंवा आणखी काही नाही. वृत्तसंस्था एएनआयने गांगुलीचा हवाला देत सांगितले की, मी काहीतरी सुरू करण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे मला वाटते की कदाचित खूप लोकांना मदत होईल. बीसीसीआय अध्यक्ष म्हणाले, 'मी बीसीसीआयच्या पदाचा राजीनामा दिलेला नाही आणि दुसरे देखील काही कारण नाही. मी जगभरात एक नवीन शैश्रणिक अॅप लाँच करत आहे. याशिवाय दुसरे काही नाही. त्यांच्या आधी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी देखील गांगुलीने आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नसल्याचे स्पष्ट केलं

हेही वाचा: कार्यालयात लावला चक्क लादेनचा फोटो, सरकारी अधिकारी निलंबित

याआधी गांगुलीने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल चाहते आणि सहकारी खेळाडूंचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले की, आज मी काहीतरी सुरू करण्याचा विचार करत आहे, ज्याचा फायदा अनेकांना होईल. मला आशा आहे की जीवनाच्या या नवीन अध्यायात तुम्ही माझ्यासोबत राहाल.

हेही वाचा: शरद पवारांवरील टीका पडली महागात, गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल

गांगुली यांनी काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, भाजप गांगुली यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या तयारीत आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष झाले. त्यांचा कार्यकाळ या वर्षी सप्टेंबरपर्यंत आहे.

हेही वाचा: सिद्धू मुसेवालाच्या विरहात लाडक्या कुत्र्यांनी सोडलं खाणं-पिणं

Web Title: Sourav Ganguly Launched Worldwide Educational App And Not Resigned As A Bcci President

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CricketSourav GangulyBCCI
go to top