Sourav Ganguly Old Video Viral
esakal
भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत विश्वकप ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. या विजयानंतर आता सर्वत्र त्याचा कौतुक केलं जातं आहे.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही या विजयानंतर भारतीय महिला संघाचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, अशातच महिलांच्या क्रिकेट खेळण्यासंदर्भात त्याने केलेल्या एका विधानाचा जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यामुळे विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.