Sourav Ganguly : पृथ्वी की शुभमन; सौरव गांगुली म्हणाला हे 5 युवा खेळाडू IPL चं मैदान गाजवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sourav Ganguly

Sourav Ganguly : पृथ्वी की शुभमन; सौरव गांगुली म्हणाला हे 5 युवा खेळाडू IPL चं मैदान गाजवणार

Sourav Ganguly : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आयपीएल 2023 मध्ये सूर्यकुमार यादवसह अजून कोणत्या युवा खेळाडूंना पाहणे रंजक असणार हे सांगितले. माजी कर्णधाराने पाच खेळाडूंची नावे प्रामुख्याने घेतली. गांगुलीने एका मुलाखतीत सांगितले की पाच खेळाडू हे आयपीएलमध्ये चांगले नाव कमवतील त्याना पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.. यात पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, ऋतुराज गायकवाड आणि उमरान मलिक असेल. याचबरोबर गुजरात टायटन्सचा शुभमन गिल देखील या यादीत आहे.

सौरव गांगुली म्हणाला की, 'सर्वात आधी सूर्यकुमार यादव! तुम्ही नक्कीच त्याला युवा खेळाडूमध्ये समाविष्ट करणार नाही. युवा खेळाडूंचा विचार केला तर पृथ्वी शॉमध्ये खूप गुणवत्ता आहे. यानंतर ऋषभ पंतचा नंबर लागतो. त्याने संपूर्ण जगाला प्रभावित केलं आहे. मी ऋतुराज गायकवाडकडेही पाहतो. तो कसा खेळतो हेही पाहणे औत्सुक्य असणार आहे. हे तीन फलंदाज आहेत. जर उमरान मलिक फिट असेल तर तो देखील चाहत्यांचे आपल्या वेगाने मनोरंजन करू शकतो.'

हरभजन सिंग देखील या मुलाखतीवेळी उपस्थित होता. यावेळी त्याने गांगुलीला शुभमन गिल विषयी विचारले. त्यानंतर गांगुलीने आपल्या यादीत त्याचे नाव समाविष्ट केले. तो म्हणाला, 'हो नक्कीच माझ्या डोक्यातून हे नाव निसटून गेले. माझा पाचवा खेळाडू हा शुभमन गिल असेल. त्यामुळे पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड, उमारन मलिक आणि शुभमन गिल.'

(Sports Latest News)