Mumbai Indians WPL : मुंबई इंडियन्सच्या नव्या जर्सीचे झाले अनावरण, निळा - सोनेरी सोबत अजून एक रंग...

Mumbai Indians WPL
Mumbai Indians WPLesakal

Mumbai Indians WPL : भारतीय महिला क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपमधून सेमी फायनलमध्ये गाशा गुंडळून माघारी परतली. आता यानंतर सर्वांना ऐतिहासिक अशा पहिल्या महिला प्रीमियर लीगचे वेध सगळ्यांना लागले आहेत. यात मुंबई इंडियन्सने सर्वात आधी बाजी मारली आहे.

मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील महा मुकाबल्याने 4 मार्चला महिला प्रीमियर लीगचा नारळ फुटणार आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्स ही पहिली फ्रेंचायजी ठरली जिने WPL साठी पहिल्यांदा आपल्या जर्सीचे अनावरण केले. मुंबई इंडियन्सचा संघ सरावासाठी एकत्र येणारा देखील पहिला संघ ठरला आहे. संघासोबत हरमनप्रीत कौर देखील लवकरच जोडली जाणार आहे.

Mumbai Indians WPL
Asia Cup 2023: 'वर्ल्ड चॅम्पियन तरी आम्हाला इज्‍जत नाही...' पाकचा माजी खेळाडूचे रडगाणे!

मुंबई इंडियन्सने जर्सी अनावरणचा व्हिडिओ शेअर करताना म्हटले की, 'सुपरहिरोज जे परिधान करतात ते.. आमची पहिली वहिली WPL जर्सी आम्हाला खूप आवडली.' मुंबई इंडियन्सने WPL मध्ये देखील आपला निळा रंग सोडलेला नाही. याचबरोबर जर्सीमध्ये गोल्डन रंग देखील वापरण्यात आला आहे. याचबरोबर नवा नारंगी रंग देखील याच वापरण्यात आला आहे. त्यामुळे ही जर्सी पुरूषांच्या जर्सीपेक्षा वेगळी दिसते.

मुंबई इंडियन्सची WPL जर्सी मनिशा जयसिंग यांनी डिझाईन केली आहे. मुंबई हे सुमद्र किनाऱ्यावरील शहर आहे. इथे जबरदस्त सनसेट दृष्य असतात. याच सूर्याकडून उर्जा मिळते. त्याचाच नारंगी रंग देखील जर्सीमध्ये वापरण्यात आला आहे.

महिला आयपीएल WPL 2023 चा पहिला हंगाम हा राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. ही स्पर्धा जवळपास 3 आठवडे सुरू राहील. मुंबईच्या ब्रेबॉन आि डी. वाय. पाटील स्टेडियमवर हे सर्व सामने होतील. सामने भारतीय वेळानुसार दुपारी 3.30 आणि सायंकाळी 7.30 ला सुरू होतील.

Mumbai Indians WPL
Sourav Ganguly Shoaib Malik : तुला सोडत नाही तू फक्त बाहेर ये... सौरव गांगुलीनं पाकच्या शोएबला धमकावलं

लीग स्टेजमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहणाऱ्या संघ इलिमनेटर सामना खेळतील. हा सामना 24 मार्चला डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ ग्रुपमधील पहिल्या स्थानावर असलेल्या संघासोबत विजेतेपदासाठी भिडणार आहे. हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर 26 मार्चला होणार आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com