esakal | BREAKING : BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुलींना ह्रदयविकाराचा झटका, ICU मध्ये उपचार सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

Ganguly

जीममध्ये व्यायाम करताना त्यांची तब्येत ढासळली. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

BREAKING : BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुलींना ह्रदयविकाराचा झटका, ICU मध्ये उपचार सुरु

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

कोलकाता: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यामान अध्यक्ष सौरव गांगुली यांची तब्येत अचानक बिघडली आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यांना उपचारासाठी कोलकाता येथील वूडलँड्स हॉस्पीटलमध्ये दाखल केल्याचे समजते. जीममध्ये व्यायाम करताना त्यांची तब्येत ढासळली. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

रुग्णालयातील सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार,  सौरव गांगुली यांच्यावर एंजियोप्लास्टी करण्याची आवश्यकता असल्याचे समजते. 48 वर्षीय गांगुली यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्याच्या स्थितीला त्यांची प्रकृती स्थिर असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. शनिवार सकाळी जीममध्ये वर्कआउट करत असताना सौरव गांगुली यांना त्रास जाणवला. रुग्णालय प्रशासनाने जारी केलेल्या निवदेनात एंजियोप्लास्टीसाठी तपासणी सुरु असल्याचे म्हटले आहे.