
गांगुली विराटला पाठवणार होते कारणे दाखवा नोटीस?
नवी दिल्ली: कर्णधारपद सोडण्यावरून बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) यांनी केलेल्या विधानाला पत्रकार परिषदेत थेट छेद देणाऱ्या विराट कोहलीला (Virat Kohli) गांगुली कारणे दाखवा नोटीस बजावणार होते, परंतु बीसीसीआयमधील वरिष्ठ व्यक्तींनी गांगुलींना थांबविल्याचे वृत्त प्रसिद्ध होत आहे. (Sourav Ganguly wanted to send Virat Kohli Show Cause Notice)
हेही वाचा: Ind vs SA ODI | भारतासाठी आजचा सामना 'करो या मरो'
बीसीसीआय व विराट कोहली यांच्यामध्ये बिनसल्याचे मागील काही दिवसांत घडलेल्या घटनांवरून प्रकर्षाने दिसून येत आहे. विराट कोहलीने भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व (T20 Captaincy) सोडल्यानंतर बीसीसीआय व निवड समितीकडून (Selection Committee) त्याला ‘वन डे’ संघाच्या कर्णधारपदावरूनही दूर करण्यात आले. यानंतर बीसीसीआयशी संबंधित कोणीही मला नेतृत्व सोडू नकोस, असे विचारले नसल्याचे खळबळजनक वक्तव्य कोहलीने पत्रकार परिषदेत केले होते. त्यावरूनच गांगुली त्याला कारणे दाखवा नोटीस पाठवणार होते; पण बीसीसीआयमधील इतर पदाधिकाऱ्यांकडून गांगुलींना तसे करू नका, असे सांगण्यात आले व त्यानंतर गांगुली तिथेच थांबले. (Show Cause Notice to Virat News)
हेही वाचा: T20 WC 2022 वेळापत्रक जाहीर; भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी
विराट कोहलीने टी-२० विश्वकरंडकाआधी (T20 World Cup) भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. ‘कोहलीला वैयक्तिकरित्या पद सोडू नको, अशी विनंती करण्यात आली होती.’ असे गांगुलींनी म्हटले होते. त्यावर मला कोणीही अशी विनंती केली नाही, असा खुलासा विराटने केला होता.
Web Title: Sourav Ganguly Wanted To Send Virat Kohli Show Cause Notice
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..