गांगुलीलाही व्हायचेय भारतीय संघाचा प्रशिक्षक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्मधार सौरभ गांगुली याने देखील भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषविण्याची ÷इच्छा व्यक्‍त केली आहे. पण, सध्या तरी आपण याचा विचार करत नाही. भविष्यात आपण नक्कीच या पदासाठी उत्सुक असू, असे त्याने म्हटले आहे. 

कोलकता - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्मधार सौरभ गांगुली याने देखील भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषविण्याची ÷इच्छा व्यक्‍त केली आहे. पण, सध्या तरी आपण याचा विचार करत नाही. भविष्यात आपण नक्कीच या पदासाठी उत्सुक असू, असे त्याने म्हटले आहे. 

सध्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा शोध सुरू आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. त्यानंतर गांगुलीने ही इच्छा व्यक्त केली आहे. तो म्हणाला,""नक्कीच, मला भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवायचे आहे. पण, आत्ता ती वेळ नाही. सध्या माझ्याकडे "आयपीएल', बंगाल क्रिकेट संघटना, समलोचन अशा अनेक जबाबदाऱ्या आहेत. या आधी पूर्ण करायच्या आणि मग मी प्रशिक्षकपदाचा विचार करेन.'' 

विशेष म्हणजे प्रशिक्षक निवडीच्या यापूर्वीच्या समितीचे अध्यक्षपद सौरभ गांगुलीकडेच होते. याच समितीने शास्त्री यांची निवड केली होती. 

भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक कोण असावा असे विचारले असता गांगुलीने याचा विचार निवड समिती करेल असे उत्तर दिले. तो म्हणाला,""प्रशिक्षकपदासाठी फारसे अर्ज आलेले नाहीत. फारशी मोठी नावे या स्पर्धेत दिसत नाहीत. निवड समिती याबाबत काय तो विचार करेल. फक्त प्रशिक्षकाचा कालावधी किती असेल हेच पहायला हवे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sourav Ganguly wants to be the coach of the Indian team