INDvsSA : आफ्रिकेचे शेपूट अखेर ठेचलं; भारताकडे 71 धावांची आघाडी

वृत्तसंस्था
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरवात झाल्यावर आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाप्रमाणे आफ्रिकेचे शेपूटही वळवळणार असे वाटत असतानाच अश्विनने केशव महाराज आणि कागिसो रबाडाला बाद करत आफ्रिकेचा डाव 431 धावांवर संपवला. 

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसऱ्या दिवशी आफ्रिकेने अपेक्षेपेक्षा जास्तच चांगला प्रतिकार केला. तिसऱ्या दिवसाच्या शेवटापर्यंत भारताने आफ्रिकेचे आठ फलंदाज बाद केले खरे मात्र, त्या बदल्यात त्यांनी जवळपास चारशेचा टप्पा गाठला. चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरवात झाल्यावर आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाप्रमाणे आफ्रिकेचे शेपूटही वळवळणार असे वाटत असतानाच अश्विनने केशव महाराज आणि कागिसो रबाडाला बाद करत आफ्रिकेचा डाव 431 धावांवर संपवला. 

गुडन्यूज! मी बाबा झालो; रहाणेला कन्यारत्न

सध्या भारताकडे 71 धावांची आघाडी आहे. आता भारताच्या फलंदाजांना लवकरात लवकर बाद करण्यात आफ्रिका यश मिळते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

त्यापूर्वी चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरवात होताच दोन षटकांनंतर एक गुडन्यूज आली. अजिंक्य रहाणेला कन्यारत्न झाले. त्यानंतर अश्विनने केशव महाराजला नऊ धावांवर माघारी धाडले आणि आपली सहावी विकेट घेतली. अखेर अश्विननेच रबाडाला बाद करत आफ्रिकेचा डाव संपवला. अश्विनने 46.2 षटकांमध्ये 7 बळी टिपले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: South Africa all out on 431 India lead by 71 runs in 1st test