T20WC22 IND vs SA Analysis : भारत भागीदारी तोडण्यात अपयशी, क्षेत्ररक्षणही गचाळ

पहा 40 षटकांचा थरार एका क्लिकवर......
south africa beat india by 5 wickets
south africa beat india by 5 wickets ESAKAL

South Africa Defeat India : दक्षिण आफ्रिकेने टी-20 विश्वचषक 2022 सुपर-12 फेरीच्या गट-2 सामन्यात भारताचा 5 विकेट्सनी पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिका 5 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. त्याचवेळी, भारताचा संघ तीन सामन्यांत प्रथमच गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयासह पाकिस्तानही उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. आजच्या सामन्यात कधी भारत तर कधी दक्षिण आफ्रिकेचे पारडे जड राहिले. त्यामुळे आजच्या सामन्यात प्रत्येक 10 षटकात कोणी वर्चस्व गाजवले याचे विश्लेषण करणे देखील गरजेचे आहे.

  • भारताची फलंदाजी 1-10 ओव्हर

    1. लुंगी एन्गिडीने खिंडार पाडले -

      पर्थच्या मैदानावर भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी राहिले आहेत. टीम इंडियाला 23 धावांवर पहिला धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा 15, केएल राहुल 9 आणि विराट कोहली 12 धावा काढून बाद झाले. तिघांनाही लुंगी एनगिडीने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर एनगिडीने हार्दिक पांड्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या सामन्यात केएल राहुल पुन्हा फेल झाला.

    2. सूर्यकुमारने डाव सावरला -

      दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन्ही सलामीवीर टीम इंडियाला चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरले. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा 14 चेंडूत केवळ 15 धावा करू शकला, तर केएल राहुलने 14 चेंडूत 9 धावा केल्यानंतर त्याची विकेट गमावली. पॉवर प्लेनंतर सूर्यकुमार यादवने डाव सावरला. 10 षटकांनंतर भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 60 धावा केल्या.

  • भारताची फलंदाजी : 10 - 20 ओव्हर

    1. सूर्यकुमार दिनेश कार्तिक अर्धशतकी भागीदारी -

      भारताला 49 धावांवर पाच धक्के बसले होते. यानंतर सूर्यकुमारने दिनेश कार्तिकसोबत सहाव्या विकेटसाठी 40 चेंडूत 52 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारचे झुंजार अर्धशतक केले. सूर्यकुमारने 30 चेंडूत टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 11 वे अर्धशतक झळकावले. सूर्यकुमार देखील 19 व्या षटकात 40 चेंडूत 68 धावांची झुंजार खेळी करून आऊट झाला.

    2. शेवटच्या पाच षटकात आफ्रिकी गोलंदाजांचे पुनरागमन -

      दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांने शेवटच्या काही षटकांमध्ये परत पुनरागमन केले. भारताला 19 व्या षटकात दोन धक्के दिले. या षटकात वेन पारनेलने रविचंद्रन अश्विन आणि सूर्यकुमार यादव यांना बाद केले. तर 20व्या षटकात सहा धावा दिल्या. शेवटच्या पाच षटकात भारताने 32 धावा केल्या आणि चार विकेट गमावल्या.

  • दक्षिण आफ्रिकाच्या पहिल्या 1-10 ओव्हर -

    1. अर्शदीप सिंगचा भेदक मारा आफ्रिकेला सुरूवातीलाच खिंडार -

      अर्शदीप सिंगने पर्थच्या खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी केली. अर्शदीपने आपल्या दोन षटकांत फक्त आठ धावा दिल्या आणि दोन विकेट घेतल्या. पॉवर प्ले अखेर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 3 बाद 24 अशी आहे. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला.

    2. पहिल्या तीन विकेट्स गेल्यानंतर माक्ररम आणि मिलरनेचा सावध पवित्रा

      पॉवरप्लेनंतर माक्ररम आणि मिलरने सावधगिरीने धावा करण्यास सुरुवात केली. 10 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेने 3 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा केल्या.

  • दक्षिण आफ्रिकाच्या शेवटच्या 10-20 ओव्हर -

    1. 10 व्या षटकानंतर माक्ररम मिलरने गिअर बदलला -

      मार्करामने 38 चेंडूत टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील नववे अर्धशतक झळकावले. मार्करामला रोहित शर्मा आणि विराट कोहलीने प्रत्येकी दोन जीवदान दिले. याचा फायदा त्यांनी घेतला आहे. मार्करामने 41 चेंडूत 52 धावांची शानदार खेळी केली. मार्कराम आणि मिलरने 60 चेंडूत 76 धावांची भागीदारी केली.

    2. भारताची खराब क्षेत्ररक्षण

      कोहलीने १२व्या षटकात मार्करामचा सोपा झेल सोडला, तर 13व्या षटकात रोहित स्टंपजवळ पोहोचूनही विकेट मारता आली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com