वनडेसाठी आफ्रिकेची टीम ठरली; नॉर्तजेवर आली रोहितसारखी वेळ |SA vs IND | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Temba Bavuma

वनडेसाठी आफ्रिकेची टीम ठरली; नॉर्तजेवर आली रोहितसारखी वेळ

दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाने घरच्या मैदानावर होणाऱ्या वनडेसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केलीये. आफ्रिका क्रिकेट बोर्डाने टेम्बा बवुमाच्या (Temba Bavuma) नेतृत्वाखालील संघात मार्को जेन्सनला संघात स्थान दिले आहे. टीम इंडिया (Team India) विरुद्ध तो वनडेमध्ये पदार्पण करताना दिसू शकते. याशिवाय वायने पर्नेल, सिसांदा मगाला आणि जुबेर हम्झा यांनी संघात कमबॅक केले आहे.

सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेनंतर दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात येणार आहे. 19 जानेवारीला पहिला, 21 जानेवारीला दुसरा तर 23 जानेवारीला तिसरा आणि अखेरचा वनडे सामना नियोजित आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल भारतीय संघाची धूरा सांभाळताना दिसेल. पहिल्यांदाच वनडेत विराट धोनीशिवाय दुसऱ्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.

हेही वाचा: PM मोदींनी शब्द पाळला; प्रियांकाचा आनंद गगनात मावेना! Video

कसोटी निवृत्तीनंतर डिकॉकसाठी पहिली वनडे मालिका

दक्षिण आफ्रिकेचा विकेट किपर फलंदाज क्विंटन डिकॉकलाही वनडे संघात स्थान देण्यात आले आहे. सेंच्युरियन कसोटी सामन्यातील पराभवानंतर क्विंटन डिकॉकने कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली होती. कुटुंबियांना अधिक वेळ देता यावा यासाठी कसोटीला रामराम केल्याचे क्विंटन डिकॉकनं म्हटलं होते. त्यानंतर आता त्याची ही पहिली वनडे मालिका असेल. 29 वर्षीय क्विंटन डिकॉक कशी कामगिरी करतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा: SA vs IND : कोहलीची प्रेस कॉन्फरन्सला दांडी; द्रविड म्हणाला...

नॉर्तजेची अवस्था रोहितसारखीच

दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील जलदगती गोलंदाज नॉर्तजे अजूनही दुखापतीतून सावरलेला दिसत नाही. दुखापतीमुळे त्याला कसोटीतून माघार घ्यावी लागली होती. आता वनडे संघातही त्याचा समावेश नाही. त्यामुळे नॉर्तजेची अवस्थाही रोहित शर्मासारखी झाल्याचे दिसते. भारतीय संघाचा वनडे कर्णधार कसोटीला मुकल्यानंतर वनडेलाही मुकणार आहे. तिच वेळ नॉर्तजेवर आल्याचे दिसते.

दक्षिण आफ्रिकेचा संघ

टेम्बा बवुमा (कर्णधार), केशव महाराज (उप-कर्णधार), क्विंटन डिकॉक, जुबेन हम्झा, मार्को जेन्सन, जानेमन मलान, सिसांदा मगाला, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनिग्डी, वायने पर्नेल, एंदिले फेहलुवाओ, ड्वेने प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, रस्सी व्हेन डेक दुसेन आणि कायले वेरेयने.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top