भारताविरुद्ध पराभव जिव्हारी; दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडुने घेतली निवृत्ती

भारताविरुद्ध पराभव जिव्हारी; दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडुने घेतली निवृत्ती
Summary

भारताने सेंच्युरिनवर दक्षिण आफ्रिकेचा तब्बल ११३ धावांनी पराभव करत मालिकेत १ - ० अशी आघाडी घेतली.

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू क्विंटन डी कॉक याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली. भारताने सेंच्युरिनवर दक्षिण आफ्रिकेचा तब्बल ११३ धावांनी पराभव करत मालिकेत १ - ० अशी आघाडी घेतली. सेंच्युरियनवर झालेल्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक आणि फलंदाज क्विंटन डी कॉकने कसोटीतून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. तर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने मात्र डी कॉकचा हा निर्णय कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्यासाठी असल्याचं सांगितलं आहे. भारताविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळणार नव्हता, याचा निर्णय क्विंटन डी कॉकने आधीच केला होता.

डी कॉकने त्याच्या निवेदनात म्हटलं की, सहज घेतलेला हा निर्णय नाही. निर्णयानंतर माझं भविष्य कसं असेल याचा विचार करण्यासाठी बराच वेळ मी घेतला. आता माझ्या जीवनात कशाला प्राधान्य असायला हवं? आमच्या पहिल्या अपत्याचं स्वागत आम्ही करणार आहे आणि त्याचं पालन पोषण करायचं आहे. माझं कुटुंब माझ्यासाठी सर्वकाही आहे आणि माझ्या या नव्या इनिंगसाठी मला पुरेसा वेळ हवा आहे.

भारताविरुद्ध पराभव जिव्हारी; दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडुने घेतली निवृत्ती
टीम इंडियाकडून गाबानंतर आता सेंच्युरियन 'सर'

मला कसोटी क्रिकेट आणि देशाचे प्रतिनिधीत्व करणं आवडतं. मी अनेक चढ-उतार पाहिले आणि जल्लोष, निराशा यांचाही अनुभव घेतला. मात्र मला आता असं काही मिळालं आहे ज्यावर मी आणखी प्रेम करतो असंही डी कॉकने म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com