esakal | INDvsSA : दक्षिण आफ्रिकेचा कडवा प्रतिकार; भारताला डाव गुंडाळण्याचे समाधान
sakal

बोलून बातमी शोधा

South Africa scores 275 at the end of the 3rd day in 2nd test

आघाडीच्या फळीला आलेल्या अपयशात केशव महाराज आणि व्हर्नान फिलॅंडर यांची नवव्या विकेटसाठी झालेली शतकी भागीदारी हेच दक्षिण आफ्रिकेच्या डावाचे वैशिष्ट्य राहिले. जखमी असूनही महाराजने जिगरबाज अर्धशतकी खेळी केली.

INDvsSA : दक्षिण आफ्रिकेचा कडवा प्रतिकार; भारताला डाव गुंडाळण्याचे समाधान

sakal_logo
By
ज्ञानेश भुरे

पुणे : आघाडीच्या फलंदाजांच्या मुसक्या आवळून दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वर्चस्व राखल्यानंतरही भारताला पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाचा पहिला डाव गुंडाळण्यासाठी अखेरच्या षटकाची वाट पहावी लागली. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांवर संपुष्टात आला. भारताकडे आता 326 धावांची आघाडी आहे. भारत दक्षिण आफ्रिकेला फॉलो-ऑन देणार की दुसऱ्या डावात फलंदाजी करणार हे आता उद्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होईल तेव्हाच समजेल.

सुरक्षा रक्षक सामना फुकट पाहण्यासाठी? गावसकर भडकले

आघाडीच्या फळीला आलेल्या अपयशात केशव महाराज आणि व्हर्नान फिलॅंडर यांची नवव्या विकेटसाठी झालेली शतकी भागीदारी हेच दक्षिण आफ्रिकेच्या डावाचे वैशिष्ट्य राहिले. जखमी असूनही महाराजने जिगरबाज अर्धशतकी खेळी केली. कर्णधार डू प्लेसी यानेही 64 धावा केल्या. फिलॅंडरची नाबाद 44 धावांची खेळीही महत्वाची होती. दक्षिण आफ्रिकेचा डाव जरुर संथ झाला. पण, महाराज-फिलॅंडर यांच्या भागीदारीने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन पहायला मिळाले.

भारतीय गोलंदाजांनी तिसऱ्य़ा दिवसाची सुरुवात अपेक्षित अशीच केली होती. महंमद शमी आणि उमेश यादव या वेगवान गोलंदाजांनी दुसऱ्या दिवसाच्या अखेरची अॅन्रिच नॉर्टे आणि थेउनिस डी ब्रुईन ही नाबाद जोडी तंबूत पाठवली होती. उपाहारापूर्वी त्यांनी दक्षिण आफ्रिका कर्णधार फाफ डू प्लेसी आणि क्वींटॉन डी कॉक ही जमलेली जोडी देखील फोडली. अश्विनने त्याचा त्रिफळा उडविला.  खेळाच्या पहिल्या सत्रात तीन गडी गमाविल्यानंतरही दक्षिण आफ्रिका संघाने 100 धावांची भर घातली होती. 
उपाहारानंतरच्या दुसऱ्या सत्रात पुन्हा एकदा भारताला सुरुवातीलाच यश मिळविले. जडेजाने मुथुस्वामीला बाद केले आणि त्यानंतर पुन्हा एकदा दिशा बदलून गोलंदाजी मिळाल्यावर अश्विनने डू प्लेसीचा प्रतिकार मोडून काढला. अर्धशतकी खेळी करून डू प्लेसी बाद झाला. त्यावेळी दक्षिण आफ्रिका संघ 8 बाद 162 असा अडचणीत आला होता.

INDvsSA : दक्षिण आफ्रिकेच्या शेपटाचा प्रतिकार

खांद्याच्या दुखापतीनंतरही केशव महाराज संघाची गरज ओळखून मैदानात उतरला. भारताच्या अनुभवी गोलंदाजांना आता दोन गडी बाद करणे कठिण नव्हते. पण, इथेच माशी शिंकली. पहिल्या डावातील आघाडी मोठी राखण्याच्या दृष्टिने भारतीयांचे नियोजन होते. मात्र, त्यानंतरही अखेरच्या सत्रातील खेळाने भारतीयांच्या निश्चित निराश केले. दक्षिण आफ्रिकेला रोखल्यानंतरही महाराज-फिलॅंडर यांची भागीदारी त्यांना सतावत होती.

पहिल्या सत्रात 100 धावांची भर घातल्यावर दुसऱ्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या फलंजदाजांनी कमालीचा संथ खेळ केला. उपहार ते चहापान या सत्रात त्यांनी केवळ 61 धावांची भर घातली. पण, अखेरच्या सत्रातील त्यांच्या तळातील फळीचा प्रतिकार महत्त्वाचा ठरला. या सत्रात त्यांचा डाव दिवसातील अखेरच्या षटकांत संपुष्टात आला. अखेरच्या सत्रातत दक्षिण आफ्रिका संघाने 78 धावांची भर घातली. 

विराट सारखंच द्विशतक त्यानंही केलंय; आता चौथ्या क्रमांकावर तोच हवा

सकाळच्या सत्रात अनुकूल हवामानाचा फायदा भारतीय गोलंदाजांनी उठवला. खेळपट्टीवर असलेला बाऊन्सचाही त्यांना उपयोग झाला. पण, तासाभराच्या खेळानंतर त्याही पेक्षा दुपारच्या सत्रात खेळपट्टी आणि यश भारतीय गोलंदाजांवर रुसल्यासारखे दिसले. कर्णधार बाद झाल्यावरही व्हर्नान फिलॅंडर आणि केशव महाराज यांनी 43.1 षटके किल्ला लढवत भारतीय गोलंदाजांच्या संयमाची कसोटी पाहिली.

दिवसाचा खेळ संपायला काहीच अवधी असताना अश्विनने महाराजच्या जिगरबाज खेळीला पूर्णविराम दिला. त्याने 132 चेंडूंचा सामना करताना 12 चौकारांसह 72 धावांची खेळी केली. त्याचबरोबर फिलॅंडरच्या  साथीत नवव्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली. त्यानंतर अखेरच्या षटकांत अश्विनने कागिसो रबाडा याला पायचितकरून दक्षिण आफ्रिकेच्या डावाला पूर्णविराम दिला.