SA vs IND 1st Test : पहिला दिवस केएल राहुल अन् रबाडाने गाजवला; पावसामुळे खेळ लवकर थांबवला

SA vs IND 1st Test
SA vs IND 1st Test ESAKAL

South Africa Vs India 1st Test Day 1 : भारतआणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने 59 षटकात 8 बाद 208 धावा केल्या आहेत. भारताकडून मधल्या फळीतील फलंदाज केएल राहुलने दमदार फलंदाजी करत नाबाद 70 धावा केल्या. तर विराट कोहलीने 38 आणि श्रेयस अय्यरने 31 धावांचे योगदान दिलं. शार्दुल ठाकूरने देखील 24 धावा करत केएल राहुलला चांगली साथ दिली. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने 5 विकेट्स तर नांद्रे बर्गरने 2 विकेट्स घेतल्या.

IND 208/8 (59) : दिवसाचा खेळ संपला

आधी अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबला होता. त्यानंतर पावसाने सुरूवात केल्याने पंचांनी 59 षटकांचा खेळ झाला असताना दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली. खेळ थांबला त्यावेळी केएल राहुल नाबाद 70 धावांवर तर सिराज 10 चेंडू करत शून्य धावांवर खेळत होता.

208-8 (59 Ov) : अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबला 

भारताने 59 षटकात 8 बाद 208 धावांपर्यंत मजल मारली होती. केएल राहुल 70 धावा करून नाबाद होता. मात्र ढगाळ वातावरण आणि अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला.

187-7 (52.3 Ov) : केएल राहुलचे दमदार अर्धशतक 

केएल राहुलने 80 चेंडूत नाबाद 50 धावा करत भारतीय संघाला 200 धावांच्या जवळ पोहचवले. केएल राहुलच्या अर्धशतकात 40 धावा या चौकार आणि षटकारांनीच आल्या आहेत.

176-7 (50 Ov) : शार्दुलने सोडली केएलची साथ 

शार्दुल ठाकूरने 33 चेंडूत 24 धावा करत केएल राहुलला चांगली साथ दिली होती. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी रचली. मात्र रबाडाने शार्दुलला बाद करत आपला पाचवा बळी टिपला.

163-6 (45 Ov) : केएलला शार्दुलची साथ 

भारताचे सहा फलंदाज 121 धावात गारद झाल्यानंतर केएल राहुल आणि शार्दुल ठाकूर यांनी सातव्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी रचत संघाला 160 धावांच्या पुढे पोहचवले.

121-6 : भारताचा सहावा शिलेदार पॅव्हेलियनमध्ये 

भारताचा सहावा फलंदाज रविचंद्रन अश्विन हा 8 धावा करून बाद झाला.

IND 111/5 (32.5) : भारताचा निम्मा संघ गारद 

उपहारानंतर भारताची जमलेली जोडी रबाडाने फोडली. त्याने अय्यरला 31 धावांवर बाद केलं तर रबाडानेच विराट कोहलीची 38 धावांवर शिकार करत भारताला पाचवा आणि मोठा धक्का दिला.

IND 91/3 (26) लंच ब्रेक :  विराट - अय्यरने सावरला डाव

भारताची अवस्था 3 बाद 24 धावा अशी झाल्यानंतर अनुभवी विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली. या दोघांच्या या भागीदारीमुळे भारत शतकाच्या जवळ पोहचला आहे.

IND 38/3 (13.3) : भारताची खराब सुरूवात 

एक बाजू लावून धरलेल्या यशस्वी जयस्वालला 17 धावांवर बर्गरने बाद केले. त्यानंतर शुभमन गिलची देखील बर्गरने शिकार केली.

IND 22/1 (8.3) : भारताची सावध सुरूवात 

भारताने रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सावध फलंदाजी केली. यशस्वी जयस्वालने चांगली फलंदाजी केली.

रोहित शर्मा झाला बाद 

रबाडाने भारताला पिहला धक्का दिला. त्याने कर्णधार रोहित शर्माला 5 धावांवर बाद केलं.

नाणेफेकीचा कौल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने 

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ढगाळ वातावर आणि पावसाची शक्यता पाहता भारतासाठी अशा खेळपट्टीवर फलंदाजी करणं आव्हानात्मक असणार आहे.

प्रसिद्ध कृष्णा करणार कसोटी पदार्पण 

भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याद्वारे आपले कसोटी पदार्पण करणार आहे. नाणेफेक ही भारतीय वेळेनुसार 1.45 ला होणार असून सामना 2 वाजता सुरू होणार आहे.

मैदान ओलं असल्यानं नाणेफेकीस उशीर 

पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाचे सावट असल्याने नाणेफेकीस उशीर होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com