RSAvsIND : हनुमानं जोहन्सबर्गचा पर्वतही उचलला; पण...

HanumaVihari Latest News
HanumaVihari Latest NewsSakal

South Africa vs India 2nd Test : जोहन्सबर्ग कसोटी सामन्यात भारतीय संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेसमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारतीय संघाचा डाव सावरुन सन्मानजक धावसंख्या उभारण्यात हनुमा विहारीनं (HanumaVihari) मोलाचा वाटा उचलला. एका बाजूनं तंबूत जाण्याचा सिलसिला सुरु झाल्यानंतर तो दुसऱ्या बाजूवर संयमी खेळी करताना दिसला. 84 चेंडूत 6 चौकाराच्या मदतीने त्याने 40 धावांची बहुमूल्य खेळी साकारली. त्याला अर्धशतकाची संधी होती. पण दुसऱ्या बाजूनं विकेट पडल्यामुळे त्याचे अर्धशतक हुकले. त्याने जी संयमी खेळी केली ती लाजवाब अशीच होती.

विराटची दुखापत अन् अय्यरची पोटदुखीमुळे मिळाली संधी

दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहली पाठिच्या दुखापतीमुळे खेळणार नाही हे स्पष्ट झाले. त्यानंतर पदार्पणात शतकी खेळी करणारा श्रेयस अय्यर प्लेइंग इलेव्हनमध्ये फिक्स होता. पण त्याला पोटदुखीचा त्रास असल्यामुळे हनुमा विहारीला संधी मिळाली. मिळालेल्या संधीच त्यानं पुन्हा एकदा सोनं करुन दाखवलं. याआधी सिडनी कसोटीत त्याने आपल्यातील संयमी खेळ दाखवून दिला होता. त्याने अश्विनच्या साथीनं भारतीय संघाचा पराभव टाळला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने केलेली 40 धावांची नाबाद खेळी टीम इंडियाला मॅच विनर आणि ऐतिहासिक मालिका जिंकण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com