SA vs NZ : उन्हाचा चटका अन् धावांचा पाऊस! पुण्यातील सामन्यात मराठा आंदोलनामुळे कडेकोट बंदोबस्त

South Africa vs New Zealand World Cup 2023
South Africa vs New Zealand World Cup 2023

South Africa vs New Zealand World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डीकॉक, रासी व्हॅन डर ड्युसेन आणि डेव्हिड मिलर यांनी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करून धावांचा पाऊस पाडला. या पावसात भिजण्याचा आनंद गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर चाहत्यांनी घेतला; मात्र नंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करल्याने साडेसातनंतरच प्रेक्षकांनी मैदान सोडायला सुरुवात केली होती.

South Africa vs New Zealand World Cup 2023
Sachin Tendulkar Statue : सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण संपन्न; मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांचीही उपस्थिती

दुपारी दोनच्या सुमारास लढतीला सुरुवात झाली. दुपारचे तापमान ३३ अंश सेल्सियस होते. उन्हाचा चटका चांगलाच जाणवत होता. त्याही परिस्थितीत बारा वाजताच दहा हजारांहून अधिक चाहते मैदानात उपस्थित होते. यात लहान मुलांचाही समावेश होता. यानंतर दुपारी दोननंतर गर्दी २० हजारांच्या पुढे गेली.

गहुंजे स्टेडियमची रचना पाहता निम्म्या प्रेक्षकांना दुपारच्या लढतीचा आनंद उन्हात बसूनच घ्यावा लागतो. हा उन्हाचा चटका सोसून चाहत्यांनी डीकॉक, डुसेन आणि मिलरच्या फटकेबाजीचा आनंद घेतला; मात्र न्यूझीलंडकडून फटकेबाजी न झाल्याने ही लढत एकतर्फी होईल हे स्पष्ट झाले. त्यात न्यूझीलंडचा निम्मा संघ ९० धावांतच माघारी परतला होता.

South Africa vs New Zealand World Cup 2023
Quinton de Kock : 6 सामन्यात 4 शतकं! क्विंटन डिकॉकने रचला इतिहास, आता रडारवर रोहित

तेव्हाच लोकांनी वाहतूककोंडीचा सामना करावा लागू नये म्हणून मैदान सोडले होते. ही लढत पाहण्यासाठी ३१ हजार ९०० प्रेक्षक उपस्थित होते. या मैदानातील विश्‍वकरंडकातील ही तिसरी लढत होती. भारत-बांगलादेश लढतीला ३३ हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते.

आता या मैदानावर आठ नोव्हेंबरला इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स आणि ११ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश लढत होणार आहे. दरम्यान, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्टेडियमच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. कडक तपासणी होत होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com