Video : 6,6,6,6,4,6.... एका षटकात ठोकल्या 34 धावा अन् 13 चेंडूत तुफानी अर्धशतक! द. आफ्रिकेला मिळाला नवा एबी डिव्हिलियर्स

South Africa's Steve Stolk U19 Men's Cricket World Cup News :
South Africa's Steve Stolk U19 Men's Cricket World Cup News Marathi
South Africa's Steve Stolk U19 Men's Cricket World Cup News Marathi

U19 Men's Cricket World Cup : दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज स्टीव्ह स्टोकने अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये बॅटने धुमाकूळ घातला. स्कॉटलंडविरुद्ध त्याने स्फोटक फलंदाजी करताना फक्त 13 चेंडूत अर्धशतक ठोकले, जे अंडर-19 वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान अर्धशतकही आहे.

स्कॉटलंडने दिलेल्या 270 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला स्टीव्ह स्टोकने झंझावाती सुरुवात करून दिली. पहिल्याच चेंडूपासून तो जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता आणि त्याने तसेच केले मैदानात षटकार चौकारचा पाऊस पडला. स्टोकने अवघ्या 13 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

South Africa's Steve Stolk U19 Men's Cricket World Cup News Marathi
Ranji Trophy : ३४ चौकार, २६ षटकार...! तन्मय अग्रवालने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये रचला इतिहास

यासामन्यात त्याने 37 चेंडूंचा सामना करत 86 धावांची शानदार खेळी खेळली. 232 च्या स्ट्राईक रेटने खेळताना स्टोकने 7 चौकार आणि 8 गगनचुंबी षटकार ठोकले. त्याच्या या खेळीनंतर दक्षिण आफ्रिकेला नवा एबी डिव्हिलियर्स मिळाला असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

एका षटकात 34 धावा

या झंझावाती खेळीदरम्यान स्टीव्ह स्टोकने कासिम खानच्या एका षटकात 34 धावा ठोकल्या. कासिमच्या या षटकाची सुरुवात त्याने लांबलचक षटकार मारून केली. पुढच्या तीन चेंडूंवर स्टोकने पुन्हा सलग तीन षटकार ठोकले. षटकाच्या पाचव्या चेंडूवर स्टोकने चौकार मारला, त्यानंतर शेवटचा चेंडू पुन्हा एकदा षटकार ठोकला.(South Africa's Steve Stolk U19 Men's Cricket World Cup News Marathi)

स्टीव्ह स्टोकच्या स्फोटक खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने स्कॉटलंडने दिलेले 270 धावांचे लक्ष्य अवघ्या 27 षटकांत पूर्ण केले. स्टोकशिवाय दिवाण मराईसने 50 चेंडूत 80 धावांची स्फोटक खेळी केली. 160 च्या स्ट्राईक रेटने खेळत असलेल्या मराइसने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकार मारले आणि संघाला विजयापर्यंत नेऊन परतले. डेव्हिड टायगरने 38 चेंडूत नाबाद 43 धावा केल्या. तत्पूर्वी, स्कॉटलंडने 50 षटकांत 9 गडी गमावून 269 धावा केल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com