Sport News : भारतीय टेनिस संघ इस्लामाबादमध्ये खेळणार ?

डेव्हिस करंडक पाक टेनिस फेडरेशनचा आग्रह
sport
sport sakal

नवी दिल्ली - डेव्हिस करंडक जागतिक गट-१ प्लेऑफमध्ये भारत व पाक यांच्यातील लढतीचा ड्रॉ निश्चित झाला. या लढतीचा यजमान पाकिस्तान आहे. या वेळी भारताला पाकमध्ये येऊन खेळावे लागेल, अशी भूमिका पाक टेनिस फेडरेशनने घेतली आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

२०१९ मधील आशिया-ओशियाना गट-१ मध्येही भारताचा सामना पाकमध्ये नियोजित होता; परंतु भारतीयांनी सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे तो सामना कझाकस्तानला खेळवण्यात आला होता. २०१९ मध्ये पाकमधील लढत इतरत्र हलवणे शक्य झाले होते;

परंतु यंदा जागतिक टेनिस संघटनेला राजी करणे भारतीय टेनिस संघटनेसाठी तेवढे सोपे नसेल, असे सांगण्यात येत आहे. या वेळी भारतीय संघ पाकमध्ये येऊन सामना खेळेल,असा विश्वास पाकचा अनुभवी खेळाडू अकील खान याने व्यक्त केला. गेल्या आठवड्यात जागतिक गट-२ मध्ये पाकने आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात इंडोनेशियाचा ४-० असा पराभव केला होता. इस्लामाबाद येथे झालेल्या सामन्यात अकीलने एकेरी आणि दुहेरीची लढत जिंकली होती.

sport
Ahmednagar : सोनईत रंगभरणातून पर्यावरणाचा श्रीगणेशा

यावेळची भारताविरुद्धची लढत आम्ही ग्रास कोर्टवर खेळवू, असे पाक टेनिस संघटनेचे अध्यक्ष सलिम सैफुल्ला खान यांनी सांगितले. भारतीय संघ लढतीसाठी पाकमध्ये न येणे योग्य ठरणार नाही. भारतीय संघ आमच्यापेक्षा निश्चितच वरचढ आहे, आम्हीही चांगले यजमान आहोत, भारताने संघ पाकमध्ये पाठवला तर चांगला संदेश दिला जाईल, असेही सलिम सैफुल्ला खान म्हणाले.

sport
Sport News : नागपूरच्या सिया देवधरची आशियाई स्पर्धेसाठी निवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com