Ahmednagar : सोनईत रंगभरणातून पर्यावरणाचा श्रीगणेशा

‘आनंदवन’चा उपक्रम; ३०० गणेशमूर्तींची स्थापना
ahmednagar
ahmednagarsakal

सोनई -शाडूमातीच्या गणेशमूर्ती रंगभरण स्पर्धेमुळे सोनई व परिसरातील तीनशे घरांत पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. येथील पसायदान-आनंदवन सेवाभावी संस्था व तुलसी ज्वेलर्सच्या संयुक्त विद्यमाने हा आगळा उपक्रम राबविण्यात आला.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

सुजाता विद्यालय, किड्स किंग्डम विद्यालय, स्मार्ट किड्‌स विद्यालय, शनिशिंगणापूर येथील लोटस विद्यालय व घोडेगाव येथील गुरुकुल विद्यालय येथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. ‘आनंदवन’चे अध्यक्ष उदय पालवे, सचिव संजय गर्जे, अरुण घावटे, डॉ. तुषार दराडे, अनिल वाघ, कृष्णा सुद्रिक आदींनी विद्यालयात उपक्रमाची माहिती दिली. विजेत्या पंधरा विद्यार्थ्यांना आठ, पाच व तीन ग्रॅम चांदीचे नाणे, प्रशस्तिपत्र व विसर्जनानंतर विरघळलेल्या मातीत टाकण्यासाठी तुळशीच्या बिया देण्यात आल्या.

विजेते स्पर्धक याप्रमाणे समर्थ कदम, कार्तिक कदम, ऋतुजा कंक, रुद्र सोनवणे, साक्षी लोहकरे, बाळकृष्ण तांबे, अस्मिता बनकर, सार्थक कुसळकर, राही चंगेडिया, वेदश्री पतंगे, श्रुती बानकर, समृद्धी शेटे, रोहन शेटे, जीवन एडके, सोहम पायमोडे, तन्वी टेमकर (गुरुकुल).

ahmednagar
Solapur News : तर आमदार ,खासदारांचीही कंत्राटी पद्धतीने भरती करा ; कंत्राटी भरती विरोधात तरुणांमध्ये व्यक्त होताहेत तीव्र भावना

बक्षीस वितरण ‘तुलसी’चे संचालक बाळासाहेब सिकची, डॉ. स्वाती अट्टल, सुयोग व प्रतीक सिकची यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी किरण सोनवणे, प्राचार्य सोनल लोढा, प्राचार्य कीर्ती बंग, डॉ. मंगल व डॉ. रावसाहेब बानकर, विष्णू कराळे व प्राचार्य सुजाता जावळे उपस्थित होते.

पुढील वर्षी पीओपी गणेशाचे विसर्जन व मातीच्या गणपतीचे विसर्जन, अशा दोन छायाचित्रांचे वास्तव दाखवून, दोन महिने अगोदर पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती विक्रीसाठी नोंदणी केली जाणार आहे.

संजय गर्जे, सचिव, आनंदवन संस्था

ahmednagar
Ahmednagar : एकलहरे शिवारात धाडसी दरोडा,गळा आवळून खून,रोख सात लाखांसह दागिने लांबविले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com