
Sports News 2024: ऑलिंपिक आणि ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा थरार गतवर्षात अनुभवल्यानंतर आता २०२५ हे वर्षही विविध खेळांचे भरगच्च सामने, मालिका अन् स्पर्धांच्या मेजवानीसाठी सज्ज झाले आहे.
या नव्या वर्षात सुरुवातीलाच म्हणजेच फेब्रुवारीत क्रिकेटची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तान आणि दुबईत होत आहे. तब्बल सात वर्षांनंतर या स्पर्धेचे पुनरुज्जीवन होत आहे. भारतात तसे यंदा मोठ्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन नाही, परंतु महिलांची एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा सप्टेंबर महिन्यात होणार आहे.