Asian Games : आशिया स्पर्धेसाठी भारताच्या फुटबॉल संघाचा मार्ग मोकळा

क्रीडा मंत्रालयाने केला नियमाला अपवाद
Asian Games football team
Asian Games football teamsakal

नवी दिल्ली : थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत आर्जव करण्यापर्यंतचे सर्व प्रयत्न यशस्वी ठरले असून हाँगझाऊ येथील आशिया क्रीडा स्पर्धेत भारताचे पुरुष आणि महिला फुटबॉल संघ पाठवण्याचा निर्णय क्रीडा मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी नियमात बदल करण्यात आला.

आशिया खंडातील क्रमवारीत अव्वल आठ संघांत स्थान असेल तरच फुटबॉल संघ पाठवले जातील, असा क्रीडा खात्याचा नियम आहे. त्यामुळे भारतीय ऑलिंपिक संघटनेने फुटबॉल संघ पाठवण्यास नकार दिला होता.

Asian Games football team
MNS VS BJP: 'पृथ्वीवरचा सर्वात मोठा पक्ष ह्या ३१ वर्षाच्या तरुणावर तुटून पडलाय', मनसेचं भाजपला प्रत्युत्तर

भाजपचे खासदार अध्यक्ष असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने क्रीडा मंत्रालयाला संघ पाठवण्याबाबत विनंती केली होती. तसेच पुरुष संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा आणि आम्हाला खेळण्याची संधी द्यावी,

असे आर्जव केले होते. हे सर्व प्रयत्न फळाला आले आहेत. भारतीय फुटबॉल संघासाठी आनंदाची बातमी आहे. पुरुष आणि महिलांचे संघ आशिया स्पर्धेसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

Asian Games football team
Asia Cup 2023 : पाकिस्तानची चिटिंग अन् अंपायरची बेईमानी? भारताला फायनलमध्ये मोठा फटका

आशिया खंडातील क्रमवारीत अव्वल आठ संघांत स्थान नसले तरी सध्याची कामगिरी निश्चितच आशादायी आहे. त्यामुळे आम्ही नियमाला अपवाद केला. आता आशिया स्पर्धेत आपला संघ जोरदार कामगिरी करेल, अशी आशाही ठाकूर यांनी व्यक्त केली. पुरुषांचा संघ आशियातील क्रमवारीत १८ व्या, तर महिलांचा संघ ११ व्या क्रमांकावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com