बनावट कंपन्यांकडून राहुल द्रविडची ४ कोटींची फसवणूक

वृत्तसंस्था
सोमवार, 19 मार्च 2018

बंगळूरू - भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडची चार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी एका बनावट कंपनीविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. विक्रम इन्व्हेस्टमेंट कंपनीविरोधात दोन दिवसांपूर्वी तक्रार दाखल करण्यात आली असून, अधिक तपास सुरू असल्याचे सदाशिवनगर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक नवीन यांनी दिली. 

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे द्रविड यांनी 2014 मध्ये संबंधित कंपनीत मोठ्या परताव्याच्या अपेक्षेने 20 कोटींची गुंतवणूक केली होती. मात्र, त्यांची मूळ गुंतवणूक रक्कम मिळण्यासही चार कोटी रुपये कमी असल्याचे या तक्रारीमध्ये म्हटले आहे. द्रविड यांना मूळ रकमेच्या 80 टक्के रक्कम मिळाली असून, 20 टक्के मिळाली नाही. वीस कोटींपैकी 16 कोटी परत मिळाले असून, चार कोटी अद्यापही मिळालेले नाहीत. 

क्रीडापटूंच्या फसवणुकीची शक्‍यता 
विक्रम इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या माध्यमातून लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बंगळूरू पोलिसांनी मागील आठवड्यात पाच जणांना अटक केली होती. त्यामध्ये एका क्रीडा पत्रकाराचाही समावेश होता. अनेक क्रीडापटूंची या कंपनीकडून फसवणूक झाल्याची वृत्ते असली, तरी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांनी पहिल्यांदा कंपनीविरोधात तक्रार दाखल केली असल्याचे नवीन यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Bangalore Rahul Dravid fraud of 4 crores by counterfeit companies