esakal | इंग्लंडचा डकेट निलंबित; अँडरसनवर मद्य ओतले?
sakal

बोलून बातमी शोधा

इंग्लंडचा डकेट निलंबित; अँडरसनवर मद्य ओतले?

इंग्लंडचा डकेट निलंबित; अँडरसनवर मद्य ओतले?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पर्थ - ॲशेस मालिकेत मैदानावर वाताहत होत असलेल्या इंग्लंडसमोर मैदानाबाहेर वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. पर्थमधील एका बारमध्ये तरुण फलंदाज बेन डकेट याचा एका वरिष्ठ सहकाऱ्याशी वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात डकेटने त्याच्या अंगावर मद्य ओतले. हा सहकारी जेम्स अँडरसन असल्याचे समजते. डकेटला इंग्लिश क्रिकेट मंडळाने निलंबित केले आहे. 

प्रशिक्षक ट्रेव्हर बेलीस त्याच्या बेशिस्त वर्तनामुळे संतप्त झाले आहेत.  ते म्हणाले की, माझे काम संघाला प्रशिक्षण देण्याचे आहे, पण या दौऱ्यावर खेळाडूंच्या वर्तनाविषयी खुलासा करण्यात माझा वेळ जात आहे. 
दरम्यन, मंडळ या प्रकरणी २४ तासांत चौकशी पूर्ण करेल.

loading image
go to top