esakal | धोनीच्या माजी संघाचे ‘रणजी’त पुनरागमन
sakal

बोलून बातमी शोधा

धोनीच्या माजी संघाचे ‘रणजी’त पुनरागमन

धोनीच्या माजी संघाचे ‘रणजी’त पुनरागमन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - महेंद्रसिंह धोनीने नेतृत्त्व केलेला बिहारचा रणजी संघ आगामी देशांतर्गत मोसमात पुनरागमन करणार आहे. 

रणजी करंडकासह देशांतर्गत स्पर्धेत बिहार संघास खेळण्याची परवानगी देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी भारतीय क्रिकेट मंडळास दिला आहे. या निर्णयामुळे २००३-०४ च्या रणजी प्लेट स्पर्धेत खेळल्यानंतर बिहार प्रथमच देशांतर्गत स्पर्धात खेळेल. त्या वेळी महेंद्रसिंह धोनीने बिहारचे नेतृत्व केले होते.  भारतीय क्रिकेट मंडळाने झारखंडला मान्यता दिल्याच्या विरोधात आदित्य वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

loading image
go to top