भारताच्या गटात इंग्लंड, कोस्टारिका?

पीटीआय
शुक्रवार, 7 जुलै 2017

मुंबई - भारतात प्रथमच होत असलेल्या विश्‍वकरंडक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेचा ड्रॉ आज (ता. ७) मुंबईत काढण्यात येईल. या स्पर्धेची गटवारी या वेळी निश्‍चित होणार आहे. त्यानुसार भारताचा समावेश असलेल्या ‘अ’ गटात इंग्लंड, कोस्टारिका असतील, असा अंदाज फुटबॉल अभ्यासकांनी व्यक्त केला.

मुंबई - भारतात प्रथमच होत असलेल्या विश्‍वकरंडक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेचा ड्रॉ आज (ता. ७) मुंबईत काढण्यात येईल. या स्पर्धेची गटवारी या वेळी निश्‍चित होणार आहे. त्यानुसार भारताचा समावेश असलेल्या ‘अ’ गटात इंग्लंड, कोस्टारिका असतील, असा अंदाज फुटबॉल अभ्यासकांनी व्यक्त केला.

या स्पर्धेचा ड्रॉ काढला जात असला तरी तो निश्‍चित करताना एकाच गटात सर्व ताकदवान संघ येणार नाहीत, याकडे लक्ष दिले जाते. त्यासाठी त्यांची क्रमवारी यापूर्वीच्या स्पर्धेतील कामगिरीनुसार ठरते. त्यातही गतस्पर्धेतील यशाला जास्त महत्त्व दिले जाते. आता गतविजेते नायजेरिया या स्पर्धेस पात्र ठरलेला नाही. त्यामुळे गतउपविजेता माली आघाडीवर असेल. 

भारत यजमान असल्यामुळे पहिल्या संचात असेल. यात मेक्‍सिको, ब्राझील, जर्मनी, माली व फ्रान्स आहेत. दुसऱ्या संचात स्पेन, जपान, न्यूझीलंड, इंग्लंड, इराण व अमेरिका असतील. तिसऱ्या संचात कोस्टा रिका, उत्तर कोरिया, होंडुरास, इराक, तुर्की, कंबोडिया आहेत, तर चौथ्या संचात चिली, पॅराग्वे, घाना, गुईना, निगार, न्यू कॅलेडोनिया असतील.

यजमान असल्यामुळे भारतास ‘अ’ गटातील एक क्रमांक देण्यात येईल. जागतिक महासंघ एकाच खंडातील दोन संघ एकाच गटात नसतील याकडे लक्ष देत असतो. 

भारताचे उपांत्यपूर्व फेरीचे लक्ष्य
मायदेशात प्रथमच होणाऱ्या जागतिक महासंघाच्या स्पर्धेत भारताचे लक्ष्य उपांत्यपूर्व फेरी असेल, असे मार्गदर्शक लुईस नॉर्तन डे मॅटोस यांनी सांगितले. उपांत्यपूर्व फेरीचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकणारे आहे, असेही त्यांनी सांगितले. अर्थातच या स्पर्धेद्वारे भारताची फुटबॉल प्रगतीही दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच वेळी त्यांनी भारताच्या बहुतेक प्रतिस्पर्धी संघांना १० वर्षांचा अनुभव आहे, याकडेही लक्ष वेधले. आंतरराष्ट्रीय लढती आणि स्पर्धेतील लढती यांत खूपच तफावत असते, असेही त्यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news FIFA