esakal | आयटीएफ टेनिस स्पर्धेत अर्जुनचा दोन्ही गटांत धडाका
sakal

बोलून बातमी शोधा

अर्जुन कढे - ऋषभदेव रमण

आयटीएफ टेनिस स्पर्धेत अर्जुनचा दोन्ही गटांत धडाका

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चेन्नई - भारताच्या अर्जुन कढेने आयटीएफ टेनिस फ्युचर्स ग्रेड ८ स्पर्धेच्या दोन्ही गटांतील धडाकेबाज आगेकूच कायम राखली. त्याने एकेरीत उपांत्य, तर दुहेरीत अंतिम फेरी गाठली. एकेरीत त्याने कॅनडाच्या केल्सी स्टीव्हन्सन (जागतिक क्रमांक १०७४) याचे कडवे आव्हान पहिल्या सेटच्या पिछाडीनंतर ३-६, ६-४, ६-४ असे परतावून लावले. हा सामना एक तास ५६ मिनिटे चालला.

दुहेरीत उंचापुरा अर्जुन आणि छोट्या चणीचा ऋषभदेव रमण यांची जोडी आणखी स्थिरावली. या गटात अर्जुनसमोर पुन्हा केल्सीचेच आव्हान होते.

केल्सीने मेक्‍सिकोच्या ल्युकास गोमेझसह भाग घेतला होता. अर्जुन-ऋषभदेव यांनी ६-४, ६-३ असा विजय एक तास चार मिनिटांत मिळविला. आता त्यांची लक्षित आणि चंद्रील या सूद बंधूंशी लढत होईल. अग्रमानांकित सूद बंधूंनी दोन सामने जिंकले. एकेरीत हादीन बावा, जयेश पुंगलिया यांचा पराभव झाला.

द्वितीय मानांकित शशिकुमार मुकुंदने हादीनला ७-५, ७-६ (८-६), तर चौथ्या मानांकित नेदरलॅंड्‌सच्या कॉलिन वॅन बीमने जयेशला ७-५, ६-३ असे हरविले.

loading image